
Government Job September 2025 : सप्टेंबर 2025 हा महिना सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. या महिन्यात अनेक प्रमुख सरकारी संस्थांनी भरतीची घोषणा जाहीरात काढली आहे. यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), रेल्वे (Railways), इंटेलिजन्स ब्युरो (IB), युपीपीएससी (UPPSC), एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance), एनएचपीसी (NHPC) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते उच्च शिक्षण घेतलेल्या इंजिनीअरिंग पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी विविध संधी उपलब्ध आहेत.
या भरतीमध्ये अधिक पगाराच्या अधिकारी-स्तरीय पदांपासून ते प्रवेश-स्तरीय पदांपर्यंत अनेक जागा रिक्त आहेत. आयटी (IT) व्यावसायिक, लॅब टेक्निशियन (Lab Technicians) आणि इतर अनेक क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी आहेत. येथे सप्टेंबर 2025 मध्ये उपलब्ध असलेल्या काही प्रमुख सरकारी नोकरीच्या संधींची माहिती दिली आहे.
कुठे-कुठे सरकारी नोकरीच्या संधी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL)
पद: ग्रॅज्युएट इंजिनीअर
पात्रता: बी.टेक/बी.ई. (B.Tech/BE) (केमिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन)
अंतिम मुदत: 21 सप्टेंबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
पद: ग्रेड बी ऑफिसर (Grade B Officer) (120 जागा).
पात्रता: पदवी (Graduation) (60% गुण) किंवा पदव्युत्तर पदवी (55% गुण)
अंतिम मुदत: 30 सप्टेंबर 2025.
अर्ज करण्यासाठी लिंक
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)
पद: पॅरामेडिकल स्टाफ (Paramedical Staff)
पात्रता: संबंधित डिप्लोमा किंवा पदवी
अंतिम मुदत: 18 सप्टेंबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
(नक्की वाचा- Bank Of Maharashtra Job: 'बँक ऑफ महाराष्ट्र'त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती)
इंटेलिजन्स ब्युरो (IB)
पद: सिक्युरिटी असिस्टंट (Security Assistant) (मोटर ट्रान्सपोर्ट)
पात्रता: दहावी उत्तीर्ण, वैध एलएमव्ही (LMV) परवाना आणि 1 वर्षाचा अनुभव
अंतिम मुदत: 28 सप्टेंबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
कॅनरा बँक सिक्युरिटीज (Canara Bank Securities)
पद: ट्रेनी (विक्री आणि विपणन)
पात्रता: 50% गुणांसह पदवी, वय 20-30 वर्षे
अंतिम मुदत: 6 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
ईस्टर्न रेल्वे
स्पोर्ट्स कोटा अंतर्गत विविध पदे
अंतिम मुदत: 9 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
एलआयसी हाऊसिंग फायनान्स
फुल स्टॅक डेव्हलपर (असिस्टंट मॅनेजर), एसएपी प्रोफेशनल (असोसिएट)
पात्रता: संबंधित अनुभवासह (3-5 वर्षे) सीएस/आयटीमध्ये एमसीए/बी.टेक/एम.टेक.
एनएचपीसी (NHPC)
ज्युनिअर इंजिनीअर (Junior Engineer) आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह स्टाफ (Non-Executive Staff)
अंतिम मुदत: 1 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)
पद: ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (Junior Executive) (इंजिनीअर्ससाठी)
पात्रता: इंजिनीअरिंग/एमसीए/आर्किटेक्चर पदवी आणि वैध गेट (GATE) स्कोअर
अंतिम मुदत: 27 सप्टेंबर 2025
(नक्की वाची- RBI Recruitment 2025: रिझर्व्ह बँकेत अधिकारी बनण्याची संधी; 120 जागांसाठी भरती, चेक करा पात्रता आणि वेळापत्रक)
दिल्ली हायकोर्ट (Delhi High Court)
पद: अटेंडंट (Attendant)
पात्रता: डीएसएसएसबी (DSSSB) अधिसूचनानुसार
अंतिम मुदत: 24 सप्टेंबर 2025
या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world