Better Sleep Tips: गाढ झोप हवीय? झोपेचा 10-5-3-2-1 नियम फॉलो करा, 5 मिनिटांत मेंदू होईल शांत

Better Sleep Tips: पटकन झोप येण्यासाठी कोणते उपाय करावे आणि काय टाळावे?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Better Sleep Tips: पटकन झोप येण्यासाठी काय करावे?"
Canva

Better Sleep Tips: दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि मेंदूला शांतता मिळावी, यासाठी पुरेशा प्रमाणात झोपणं आवश्यक आहे. पण अनेकदा बिछान्यावर पडल्यानंतर मेंदू शांत होण्याऐवजी विचारांचं चक्र सुरू होतं, यामुळे काही केल्या झोप येत नाही. गाढ झोप येण्यासाठी काही मुद्रांचा सराव करावा, प्रेशर पॉइंट आणि 10-5-3-2-1 नियम फॉलो करणं आवश्यक आहे. 

गाढ झोपेसाठी कोणत्या आसनाचा सराव करावा?

मेंदूला शांतता मिळण्यासाठी शशांकासनाचा सराव करावा. यामुळे शरीरासही असंख्य फायदे मिळतील. पाठ, मज्जासंस्था, खांद्यावरील ताण कमी होईल. झोपण्यापूर्वी दोन ते तीन मिनिटांसाठी या आसनाचा सराव केल्यास मेंदू शांत होईल आणि झोप पटकन येईल. 

कोणते अवयव दाबल्यास पटकन झोप येईल?

डोळ्यांच्या मधे भुवयांच्या वर असलेल्या भागामध्ये मिनिटभर हलक्या हाताना मसाज करावा, यामुळे चिंता विकार आणि अतिविचाराची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. अशाच पद्धतीने पायांच्या तळव्यामध्ये असलेल्या किडनी पॉइंटवर हलक्या हाताने दाब द्यावा, यामुळे झोप येण्यास मदत मिळेल.

झोप येण्यासाठी विपरीतकरणी मुद्रेचा सराव 

भिंतीच्या मदतीने पाय वरील बाजूने करुन झोपावे, यामुळे काही भागांमधील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल. तीन ते पाच मिनिटे सराव करावा. यामुळे हृदयाची गतीही धीमी होईल आणि झोप येण्यास मदत मिळेल. 

Advertisement

झोपेचा 10-5-3-2-1 नियम काय आहे? (What Is the 10-5-3-2-1 Sleep Rule)

  • 10 तासांपूर्वी कॅफीनयुक्त पेय पिणे बंद करा.
  • 5 तासांपूर्वी पचनास जड असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करू नका.
  • 3 तासांपूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका.
  • 2 तासांपूर्वी मोबाइल, लॅपटॉप वापरू नका.
  • 1 तास आधी ध्यानधारणा करण्यावर भर द्यावा.

(नक्की वाचा: Cucumber Side Effects: या 5 लोकांनी काकडी खाण्याची हिंमत करू नये, अन्यथा पत्करावा लागेल इतका मोठा धोका)

लगेच झोप येण्यासाठी काय करावे?  (What To Do To Fall Asleep Instantly)

शांत आणि गाढ झोप येण्यासाठी रुमची लाइट बंद करावी तसेच तेथील वातावरणही शांत असावे.  

Advertisement

(नक्की वाचा: Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी लागते? काय उपाय करावे, कोणत्या गोष्टींचे सेवन करावे?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)