जाहिरात

Cucumber Side Effects: या 5 लोकांनी काकडी खाण्याची हिंमत करू नये, अन्यथा पत्करावा लागेल इतका मोठा धोका

Cucumber Side Effects: काकडी खाल्ल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतात, पण या पाच समस्यांचा तुम्ही सामना करत असाल तर काकडी खाणे तुमच्यासाठी विषसमान ठरेल.

Cucumber Side Effects: या 5 लोकांनी काकडी खाण्याची हिंमत करू नये, अन्यथा पत्करावा लागेल इतका मोठा धोका
"Cucumber Side Effects : कोणत्या लोकांनी काकडीचे अजिबात सेवन करू नये"
Canva

Cucumber Side Effects: काही लोकांना जेवण तसंच नाश्त्यामध्येही काकडी खाणे पसंत असते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास तसेच वजन कमी होण्यासही मदत मिळते. म्हणूनच बहुतांश लोक काकडीचा डाएटमध्ये विविध स्वरुपात समावेश करतात. पण काकडी खाणे प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरू शकत नाही. काही लोकांसाठी काकडी खाणे हानिकारक ठरते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

कोणत्या 5 लोकांनी काकडी खाणं टाळलं पाहिजे? | Cucumber Side Effects In Marathi

1. गॅस आणि पोट फुगण्याची समस्या

काकडीमध्ये कुकुरबिटासिन नावाचे तत्त्व असते, ज्यामुळे पोटामध्ये गॅस तयार होऊ शकतो. तुमच्या पोटाचे आरोग्य नाजूक असेल किंवा पोट फुगण्याच्या समस्येचा तुम्ही सामना करत असाल तर डाएटमध्ये काकडीचा समावेश करणे टाळावे.  

2. कमकुवत पचनसंस्था

काही लोकांच्या शरीराची पचनसंस्था अतिशय कमकुवत असते. काकडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पोटाच्या आरोग्यासाठी फायबर आवश्यक आहे, पण जास्त प्रमाणात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास पोट जड होतं, पोटदुखी आणि पोटात पेटकेही येऊ शकतात. 

Boiled Amla Benefits: उकडलेला आवळा खाण्याचे 10 फायदे, शिजवलेला आवळा खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर

(नक्की वाचा: Boiled Amla Benefits: उकडलेला आवळा खाण्याचे 10 फायदे, शिजवलेला आवळा खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर)

3. रात्रीच्या वेळेस काकडी खाऊ नका

तज्ज्ञांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस काकडी खाणे टाळावे. कारण काकडीचं पचन होण्यास वेळ लागते. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होऊन झोपेवर परिणाम होतील. आयुर्वेदातील माहितीनुसार, काकडी थंड प्रकृतीची असल्याने रात्रीच्या वेळेस खाणे टाळावे. 

Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी लागते? काय उपाय करावे, कोणत्या गोष्टींचे सेवन करावे?

(नक्की वाचा: Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी लागते? काय उपाय करावे, कोणत्या गोष्टींचे सेवन करावे?)

4. सायनस किंवा सर्दी-खोकला 

तुम्ही सायनस, सर्दी-खोकला किंवा कफच्या समस्येचा सामना करत असाल तर काकडी खाणे टाळावे, यामुळे अन्य समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. 

5. अ‍ॅलर्जी

काही लोकांना काकडी खाल्ल्यास अ‍ॅलर्जी होऊ शकते. उदाहरणार्थ तोंड आणि ओठाच्या भागामध्ये खाज येणे,  घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर काकडी खाणं बंद करा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com