Better Sleep Tips: शांत गाढ झोप हवीय? झोपताना बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Better Sleep Tips: शांत झोपेसाठी बेडरूमचे वातावरण कसे असावे? दरवाजा उघडा की बंद ठेवावा, तापमान किती असावे आणि पाळीव प्राण्यांना जवळ झोपवणे योग्य की अयोग्य, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Better Sleep Tips: झोपताना बेडरूमचा दरवाजा बंद ठेवावा की उघडा?"
Canva

​​​​Best Environment for Sleeping: बहुतांश लोकांना अनुकूल वातावरणाशिवाय रात्री झोप लागत नाही. काही लोकांना दरवाजे आणि खिडक्या उघडे ठेवून झोपायला आवडते तर काहींना खोली पूर्णपणे बंद केल्याशिवाय झोप लागत नाही. पण तज्ज्ञांच्या मते झोपेसाठी सर्वात उत्तम वातावरण कसे असते? हे तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या प्रकारच्या खोलीत झोपल्यास चांगली झोप मिळेल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

रात्री झोपताना खोलीचा दरवाजा उघडा की बंद ठेवावा? प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते. पण तुमच्या या सवयीचा थेट परिणाम झोप, श्वासोच्छवासाची प्रक्रिया आणि आरोग्यावर होतो. पण कोणता पर्याय आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Advertisement

रात्री झोपताना खोलीचा दरवाजा बंद ठेवावा की उघडा?

जर तुमच्या खोलीत वेंटिलेशन (Ventilation) उत्तम असेल किंवा एसी/पंखा सुरू असेल, तर दरवाजा बंद ठेवल्यास काहीही हरकत नाही. पण हवा खेळती नसेल तर दरवाजा थोडा उघडा ठेवणे फायदेशीर ठरेल.

झोपताना खोलीचे वातावरण योग्य असणे का गरजेचे आहे?

तज्ज्ञांच्या मते झोपण्यासाठी खोली थंड आणि अंधारी असणे आवश्यक आहे. खोलीचे तापमान 20 ते 22 डिग्री अंश सेल्सिअसदरम्यान असणे उत्तम मानले जाते. थंड वातावरणात चांगली झोप लागते. अंधाऱ्या खोलीमुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन सक्रिय होण्यास मदत मिळते, हे हार्मोन झोप येण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.  

(नक्की वाचा: Brown Period Blood: पीरियड्सपूर्वी तपकिरी रंगाचं रक्त येतं का? धोकादायक की सामान्य लक्षण? जाणून घ्या तुमच्या आरोग्याविषयी सर्व काही)

मुलांच्या खोलीचा दरवाजा बंद ठेवावा की उघडा ठेवावा?

दरवाजा बंद ठेवल्यास मुलांच्या खोलीतील आवाज देखील कमी होईल. जर तुम्ही तुमच्या मुलांना झोपण्याची सवय लावून देत असाल तर तज्ज्ञमंडळी दबक्या पावलाने चालण्याचा सल्ला देत नाहीत. दरवाजा बंद करा आणि आपली दैनंदिन स्वरुपातील काम करून घ्या. यामुळे लहान मुलांना हळूहळू घरातील वातावरणाचीही सवय होईल.   

Advertisement

(नक्की वाचा: Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत)

पाळीव प्राण्यांना बेडरूममध्ये झोपवणे योग्य की अयोग्य?

तज्ज्ञांच्या मते पाळीव प्राण्यांना बेडरूममध्ये न झोपवणेच योग्य आहे. रात्री त्यांच्या हालचालींमुळे किंवा त्यांच्या येण्या-जाण्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. पाळीव प्राण्यांना खोलीच्या बाहेरच झोपवण्याचा सल्ला दिला जातो.

Photo Credit: NDTV Marathi

FAQs

1. झोपताना दरवाजा बंद ठेवणे अधिक सुरक्षित का मानले जाते?

उत्तर. बंद दरवाज्यामुळे आवाज आणि प्रकाश कमी होतो, असे वातावरण झोपेसाठी स्थिर मानले जाते. 

2. मुलांना स्लीप ट्रेनिंग देताना दरवाजा बंद ठेवणे योग्य आहे का?

उत्तर. होय, यामुळे मुलाला घरातील सामान्य आवाजाची सवय होण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.

3. पाळीव प्राण्यांना बेडरूममध्ये झोपू देणे योग्य आहे का?

उत्तर. तज्ञांच्या मते, पाळीव प्राण्यांच्या हालचालींमुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)