
Buddha Purnima Yog 2025 : दरवर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) साजरी केली जाते. बौद्ध धर्मामध्ये हा दिवस विशेष मानला जातो. भगवान गौतम बुद्धांचा जन्म याच दिवशी झाला होता, असे मानले जाते. या तिथीला भगवान बुद्धांना (Buddha Purnima 2025) बोधगया येथील बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती,असेही म्हटले जाते. मान्यतेनुसार उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये या दिवशी बुद्धांना महानिर्वाण प्राप्त झाले होते. या दिवशी दानधर्माचे खूप महत्त्व आहे. यंदा बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) कधी आहे, शुभ योग आणि दानधर्माचे काय महत्त्व आहे? ते जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुद्ध पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त 2025
पंचांगनुसार, वैशाख शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीचा शुभारंभ 11 मे रोजी रात्री 8.01 वाजता होणार असून 12 मे रोजी रात्री 10.25 वाजता तिथी समाप्त होणार आहे. उदया तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा 12 मे रोजी साजरी केली जाणार आहे.
वैशाख पौर्णिमा योग 2025
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वरियान योग आणि रवी योग जुळून आले आहेत. ज्यामुळे पौर्णिमेचा दिवस अधिक खास ठरतोय. रवी योगचा कालावधी पहाटे 5:32 वाजेपासून ते 6:17 वाजेपर्यंत असणार आहे, तर भद्रावास योग सकाळी 9:14 वाजेपर्यंत असेल.
(नक्की वाचा: Hanuman Bhakti Tips: हनुमान मंदिरात या शब्दाचा 9 वेळा करा जप, बजरंगासह प्रभू रामाची होईल कृपा)
वैशाख पौर्णिमा महत्त्व 2025
बुद्ध पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांसाठी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, असे म्हणतात. या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी त्यांच्या धर्माच्या शिकवणींचे पालन करतात. हा दिवस आध्यात्मिक जागरुकता आणि मानवतेची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ओळखला जातो. ध्यान, साधना आणि करुणेने भगवान बुद्धांची पूजा केल्यास मानसिक शांती लाभते आणि जीवनातील समस्यांवर मात करण्यास मदत होते. या दिवशी दानधर्म केल्यास जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते;असेही म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world