जाहिरात

Hanuman Bhakti Tips: हनुमान मंदिरात या शब्दाचा 9 वेळा करा जप, बजरंगासह प्रभू रामाची होईल कृपा

Hanuman Bhakti Tips: ज्योतिषाचार्य संतोष उपाध्याय यांनी सांगितलेल्या एका शब्दाचा नऊ वेळा जप केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होईल आणि तुमच्यावर बजरंगबलीसह प्रभू श्रीरामाचाही कृपा कायम राहील.

Hanuman Bhakti Tips:  हनुमान मंदिरात या शब्दाचा 9 वेळा करा जप, बजरंगासह प्रभू रामाची होईल कृपा
Hanuman Bhakti Tips : हनुमानाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय

Hanuman Bhakti Tips: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या-न्-कोणत्या देवी-देवतांसाठी समर्पित आहे. मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे बजरंगबलीची पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होण्यास मदत मिळेल, असे म्हणतात. हनुमानाची विधिवत पूजा आणि उपवास केल्यास हनुमान तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करतात. तसेच ज्योतिषाचार्य संतोष उपाध्याय यांनी सांगितलेला उपाय केल्यास जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत मिळेल. ज्योतिषींनी सांगितलेल्या माहितीनुसार, हनुमानाच्या मंदिरात एका शब्दाचा नऊ वेळा जप केल्यास बजरंगबलीसह प्रभू श्रीरामचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'राम-राम'चा करा जप 

ज्योतिषाचार्य संतोष उपाध्याय यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, ज्या-ज्या सत्संगमध्ये हरी आणि रामाची चर्चा केली जाते, तेथे बजरंगबली पोहोचतात. म्हणूनच हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर राम नामाचा जप करावा. तुमच्या अनामिका बोटाने तुमच्या कंठाला स्पर्श करा आणि मनामध्ये नऊ वेळा "राम, राम" असा जप करा. असे केल्याने तुम्हाला हनुमानाचे आशीर्वाद मिळतील.

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना या 7 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...)

हनुमान चालीसा पठणाचे फायदे - Benefits Of Reading Hanuman Chalisa

- हनुमानाची विधीवत पूजा केल्यास आणि मंगळवार किंवा शनिवारी कोणत्याही एका दिवशी त्यांचे ध्यान करून उपवास केल्यास जीवनातील कित्येक समस्यांपासून सुटका मिळते. यामुळे भीतीची भावना दूर होते. 
- नकारात्मक शक्ती दूर होतात. 
- प्रत्येक दिवशी हनुमान चालीसाचे पठण केल्यास शरीराशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. 
- नियमित हनुमान चालीसाचे पठण केल्यास कोर्टाशी संबंधित सर्व समस्यांपासूनही मुक्तता मिळू शकते. 
- मानसिक आरोग्यासही बरेच फायदे मिळतात. 
- हनुमान चालीसाचे पठण केल्यास शनीदेवाच्या प्रकोपातूनही बचाव होऊ शकतो. 
- मंगळ ग्रह आणि शनी ग्रह मजबूत होऊ शकतो. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com