जाहिरात

नोकरीच्या चिंतेतून मुक्त व्हा! फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 'हे' 5 सुपरहिट व्यवसाय अन् करा बंपर कमाई

40 ते 50 हजारांच्या गुंतवणुकीत आवश्यक साधने खरेदी करून हा व्यवसाय सुरू करता येतो.

नोकरीच्या चिंतेतून मुक्त व्हा! फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 'हे' 5 सुपरहिट व्यवसाय अन् करा बंपर कमाई
  • वाढत्या महागाईच्या काळात पगारावर अवलंबून राहणे कठीण आहे
  • ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत क्लाउड किचन आणि ज्यूस स्टॉल सारखे व्यवसाय सुरू करता येतात.
  • मोबाईल रिपेअरिंग व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधने घेऊन कमी खर्चात रोजगार मिळवणे शक्य आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Business Ideas with Low Investment: वाढत्या महागाईच्या काळात केवळ पगारवर अवलंबून राहणे कठीण झाले आहे. अशा वेळी स्वतःचा छोटा का होईना, पण स्वतंत्र व्यवसाय असावा असे प्रत्येकाला वाटते. 50,000 रुपयांच्या मर्यादित गुंतवणुकीत सुरू करता येतील असे काही शाश्वत व्यवसायाचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर हे छोटे स्टार्टअप्स भविष्यात मोठे वळण घेऊ शकतात.

खाद्यसंस्कृतीतील नव्या बदलांमुळे 'क्लाउड किचन' आणि 'ज्यूस स्टॉल' हे दोन अत्यंत नफ्याचे पर्याय आहेत. यात जागेचा खर्च कमी असून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. दुसरीकडे, तंत्रज्ञानाच्या युगात 'मोबाईल रिपेअरिंग'सारख्या कौशल्यावर आधारित व्यवसायाला कधीही मरण नाही. 40 ते 50 हजारांच्या गुंतवणुकीत आवश्यक साधने खरेदी करून हा व्यवसाय सुरू करता येतो.

नक्की वाचा - Weight Loss: वयाची 30 शी ओलांडल्यानंतर पोट का सुटते? त्या मागचे कारण ऐकून हैराण व्हाल

जमीन कमी असलेल्या लोकांसाठी 'मशरूम' आणि 'मायक्रोग्रीन्स'ची शेती हा उत्तम पर्याय ठरत आहे. केवळ एका छोट्या खोलीतून किंवा गच्चीवरून हे काम सुरू करता येते. हॉटेल आणि जिममध्ये या उत्पादनांना मोठी मागणी असल्याने, कमी कालावधीत गुंतवणूक वसूल होऊन नफा मिळण्यास सुरुवात होते. हा उद्योग सुरू केल्यास मोठा फायदा झाल्याची अनेक उहादरणे आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अनेक जण वळतात. 

नक्की वाचा - Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी 'लवंगाचे पाणी' पिण्याचे फायदे माहीत आहेत का? 'या' आजारांपासून मिळेल सुटका

1. क्लाउड किचन: 
   तुमच्या घरच्या स्वयंपाकघरातून जेवण बनवून ऑनलाइन डिलिव्हरी सुरू करा. हॉटेलच्या भाड्याचा खर्च वाचेल. 
2. मशरूम फार्मिंग: 
   हॉटेल आणि मार्केटमध्ये मशरूमला मोठी मागणी आहे. एका छोट्या शेडमधून हा व्यवसाय 50  हजारात सुरू होतो. 
3. मायक्रोग्रीन्स: 
   अवघ्या 7 ते 10 दिवसांत पीक देणारी ही शेती सध्या शहरांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. 
4. ज्यूस स्टॉल: 
   ताजी फळे आणि आरोग्यासाठी फायदेशीर ड्रिंक्सचा स्टॉल लावून तुम्ही रोजचे रोख उत्पन्न मिळवू शकता. 
5. मोबाईल रिपेअरिंग: 
   थोडे प्रशिक्षण आणि 50 हजारांची साधने घेतली की तुम्ही हक्काचा रोजगार मिळवू शकता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com