जाहिरात

Green Tea : ग्रीन टीला चहा म्हणणं बेकायदेशीर, चहाची व्याख्या का बदलली?

FSSAI ने उत्पादक, विक्रेते, आयातदार आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना Camellia sinensis पासून बनवलेल्या कोणत्याही उत्पादनावर चहा हा शब्द वापरणे तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Green Tea : ग्रीन टीला चहा म्हणणं बेकायदेशीर, चहाची व्याख्या का बदलली?

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. चहाच्या व्याख्येतील बदलाबाबत त्यांनी महत्त्वाचा बदल अधोरेखित केला आहे. Camellia sinensis रोपांपासून तयार केलेलं पेय चहा म्हणून ओळखलं जाईल. याशिवाय कोणतंही अन्य रोप, फुलांपासून तयार केलेल्या पदार्थाला चहा म्हणणं योग्य नसेल.

FSSAI ने सांगितलं, हर्बल टी, रुईबोस टी आणि फ्लॉवर टी सारखी अनेक उत्पादने बाजारात चहा या लेबलखाली विकली जात आहेत. परंतु प्रत्यक्षात तो चहा नाही. नियमांनुसार, कांगडा टी, ग्रीन टी आणि इन्स्टंट टी देखील फक्त Camellia sinensis पासून बनवली गेली पाहिजे.

लेबलिंगमध्ये बदल 

प्राधिकरणाने स्पष्टपणे सांगितलं की, कोणत्याही पदार्थाच्या पॅकेजचे योग्य आणि मूळ नाव प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. Camellia sinensis पासून न बनवलेल्या  उत्पादनांवर चहा हा शब्द वापरणे चुकीच्या पद्धतीचे  ब्रँडिंग मानले जाते. अशी पेये प्रोप्राइटरी फूड किंवा "नॉन-स्पेसिफाइड अन्न" (२०१७) अंतर्गत येतील. 

Cancer : मद्यपान कमी केलं तर कर्करोगाचा धोका कमी होतो? डोळ्यात अंजन घालणारा TATA चा अभ्यास समोर

नक्की वाचा - Cancer : मद्यपान कमी केलं तर कर्करोगाचा धोका कमी होतो? डोळ्यात अंजन घालणारा TATA चा अभ्यास समोर

उत्पादक, विक्रेते आणि ई-कॉमर्स कंपन्यांसाठी आदेश

FSSAI ने उत्पादक, विक्रेते, आयातदार आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना Camellia sinensis पासून बनवलेल्या कोणत्याही उत्पादनावर चहा हा शब्द वापरणे तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई केली जाईल. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता हर्बल टी, डिटॉक्स टी, फ्लॉवर टीसारख्या पेयांच्या नावांमध्ये बदल करावा लागेल. हे पेय बाजारात असतील, मात्र चहा नावाने विकले जाणार नाही. FSSAI ने उचललेल्या या पावलामुळे चहाच्या व्याख्येबाबत बाजारातील गोंधळ दूर होईल आणि ग्राहकांना त्यांच्या कपमधील पेय खरा चहा आहे की फक्त हर्बल इंफ्यूजन आहे हे समजण्यास मदत होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com