Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून नक्कीच होऊ शकतो बचाव, दरवर्षी न चुकता करा हे काम 

Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्यथा...

जाहिरात
Read Time: 2 mins

- डॉ. सुनील पाटील, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा

Cancer Prevention Tips: कर्करोगाचे वेळीच निदान न झाल्याने दरदिवशी मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असते.  पण वर्षभरातून एकदा आरोग्य तपासणी आणि कर्करोगाचे वेळीच निदान करुन तुम्ही निरोगी जीवन जगू शकता. कॅन्सर आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होण्यासाठी आरोग्य तपासणी (Health CheckUp) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरीरामध्ये कॅन्सर आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच हेल्द चेकअपच्या मदतीने कर्करोग झालाय की नाही? याचे निदान करता येणे शक्य झालंय. शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरण्यापूर्वीच कॅन्सरचा सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेण्यास देखील मदत होऊ शकते. तपासणीमुळे औषधोपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते आणि रुग्णाची प्रकृती लवकर ठीक होण्यास मदत मिळते. नियमित आरोग्य तपासणीमध्ये शारीरिक तपासणी, रक्त चाचणी, इमेजिंग टेस्ट, पीईटी स्कॅन इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो. या तपासणीमध्ये स्तन, गर्भाशय ग्रीवा, कोलन आणि प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या सामान्य प्रकारच्या कॅन्सरचा शोध घेण्यास मदत होऊ शकते. डॉक्टर तुमचे वय, लिंग, कॅन्सरचा प्रकार, कितव्या टप्प्यातील कॅन्सर आहे त्यानुसार उपचार सुचवतात.  

(नक्की वाचा: Weight Loss Drink: पोटाच्या सर्व समस्या होतील दूर, प्या या दोन गोष्टींपासून तयार केलेले गुणकारी पेय)

नियमित आरोग्य तपासणी करण्याचे फायदे 

जीव वाचवण्यास मदत मिळू शकते

कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते आणि गुंतागुंतीची प्रक्रिया कमी होते. लक्षणे दिसू लागण्यापूर्वीच कॅन्सरचे निदान होण्यास मदत होते. यामुळे हा आजार शरीराच्या अन्य अवयवांमध्ये पसरण्यापासून रोखण्यासही मदत मिळते. 

आनुवंशिक आजारांना प्रतिबंध 

काही वेळा कॅन्सर या आजारामागील कारण अनुवांशिक असू शकते. यामध्ये स्तनाचा किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाचा समावेश असू शकतो. नियमित तपासणी केल्याने अनुवांशिक इतिहास असलेल्या व्यक्तींना कर्करोगाचे वेळीच निदान करण्यास मदत होऊ शकते. चाचणीच्या मदतीने तुम्हाला कर्करोगाचा अधिक धोका आहे की नाही हे समजू शकते. धोका असेल तर ते टाळण्यासाठी योग्य तो निर्णय घेता येऊ शकतो.  

Advertisement

(नक्की वाचा: जेवणानंतर करा या 5 गोष्टी, झटकन आत जाईल सुटलेली ढेरी आणि दिसाल एकदम फिट)

जलद आणि वेदनारहित वैद्यकीय चाचणी

कठीण स्वरुपातील वैद्यकीय चाचण्यांमुळे काही लोक कर्करोगाची तपासणी करणे टाळतात. मॅमोग्राम, रक्त चाचणी आणि त्वचेच्या तपासणीसारख्या कर्करोग तपासणी सहसा वेदनारहित असतात. शिवाय या चाचण्यांना जास्त वेळ लागत नाही. या तपासण्यांद्वारे शारीरिक आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)