Weight Loss Tips In Marathi: शरीराचे वजन वाढल्याने तुम्ही देखील टेंशन आलं आहे का? सुटलेले पोट कमी व्हावे, म्हणून उपाय शोधत आहात का... चिंता करू नका या लेखाद्वारे अशा काही साध्यासोप्या टिप्स जाणून घेऊया ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. रात्रीचे जेवण जेवल्यानंतर काही गोष्टींची सवय लावून घेतल्यास पोटावरील चरबी घटण्यास आणि शरीर आकारामध्ये येण्यास मदत मिळू शकते. जेवणानंतर कोणते काम करावे? याची माहिती जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काय करावे? What To Do After Dinner To Lose Weight
- रात्री जेवल्यानंतर थोडेसे चालावे.
- 10 ते 15 मिनिटे चालल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
- रात्री जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. एक ते दोन ग्लास पाणी पिऊ शकता.
- यामुळे शरीरामध्ये जमा झालेले विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या बाहेर फेकले जातात.
- टॉक्सिन्स बाहेर फेकले गेल्याने शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि वजन हळूहळू कमी होते आणि शरीर आकारामध्ये येण्यास मदत मिळू शकते.
- जेवणानंतर दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे तणाव कमी होतो आणि ज्यामुळे मेंदूला शांतता मिळते.
- मानसिक आरोग्य निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते.
- मानसिक आरोग्याचा तुमच्या शरीरावर थेट परिणाम होतो. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करावी.
- फोन आणि कम्प्युटरचा जास्त वापर करणे टाळावे. यामुळे डोळे आणि त्वचेवर वाईट परिणाम होतात.
- एकाच जागी बसून काम केल्यानंही शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होऊ लागतात.
- जेवल्यानंतर लगेचच नव्हे पण काही तासांनंतर सोप्या स्वरुपातील स्ट्रेचिंग एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
- जेवण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करावे म्हणजे अन्नाचे पचन होण्यास मदत मिळेल आणि व्यायाम करण्यासही वेळ मिळेल.
- महत्त्वाचे म्हणजे रात्रीचे जेवण पचनास हलके असावे.
(नक्की वाचा: Winter Beauty Tips: चेहऱ्यावर लावा ही पांढरी गोष्ट, त्वचेवर येईल नॅचरल ग्लो)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world