जाहिरात
This Article is From Apr 23, 2024

गुलाबी चंद्राचे आज घडणार दर्शन, जाणून घ्या Pink Moon म्हणजे काय?

Pink Moon 2024: चैत्र महिन्यामध्ये गुलाबी चंद्राचे दर्शन घडणार आहे. पिंक मून म्हणजे काय? कधी दिसणार पिंक मून? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...

गुलाबी चंद्राचे आज घडणार दर्शन, जाणून घ्या Pink Moon म्हणजे काय?
पिंक मून म्हणजे काय आणि कधी दिसणार Pink Moon?  

Pink Moon 2024: हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी गुलाबी चंद्राचे दर्शन घडते. यंदा चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima) 23 एप्रिल रोजी आहे. या दिवशी आकाशामध्ये गुलाबी चंद्र पाहायला मिळेल. पिंक मून म्हणजे प्रत्यक्षामध्ये गुलाबी रंगाचा चंद्र दिसत नाही, तर नेहमीप्रमाणेच चंदेरी आणि सोनेरी रंगाचाच चंद्र नजरेस दिसतो.

पिंक मून असे का म्हणतात?  

अमेरिकेतील पूर्व भागामध्ये आढळणाऱ्या 'मॉस पिंक' नावाच्या वनऔषधीवरून 'पिंक मून' असे नाव देण्यात आले आहे.   

(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2024: तुळशीच्या पानावर रेखाटले हनुमानजींचे चित्र PHOTOS)

चैत्र पौर्णिमेला दिसतो गुलाबी चंद्र (Pink Moon On Chaitra Purnima) 

यंदा चैत्र पौर्णिमा तिथीचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी होणार असून 24 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 18 मिनिटांपर्यंत पौर्णिमेची तिथी समाप्त होईल. काही जण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील करतात, कारण ते शुभ मानले जाते.

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

पिंक मूनची अन्य नाव

पिंक मून अन्य विविध नावांनीही ओळखला जातो. उदाहरणार्थ 'स्प्राउटिंग ग्रास मून', 'एग मून', 'फिश मून', 'पासओव्हर मून', 'पक पोया' आणि 'फेस्टिव्हल मून' अशीही नावे आहेत. तसेच चैत्र पौर्णिमेला 'चैती पूनम' (Chaiti Punam) असेही म्हणतात. या दिवशी 'हनुमान जयंती' देखील साजरी केली जाते.   

पिंक फुल मून कधी दिसतो?

जेव्हा दोन घटना एकाच वेळी घडतात तेव्हा पिंक फुल मून पाहायला मिळतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्याच वेळेस पौर्णिमा असेल तर पिंक फुल मूनचे (Pink Full Moon) दर्शन घडते. यंदाच्या पौर्णिमेला आकाशामध्ये हेच दृश्य पाहायला मिळणार आहे. 

(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

चंद्राचे विविध रंग

पिंक मूनव्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे वेगवेगळ्या रंगांमध्येही दर्शन घडते. कधीकधी प्रदूषणामुळे चंद्राचा रंग नारिंगी किंवा पिवळा दिसू शकतो. याशिवाय हवेतील धूलिकणांमुळे चंद्राचा रंग बदलताना दिसतो आणि चंद्रांचा रंग तपकिरी दिसू शकतो. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com