जाहिरात

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहण कधी आहे? सूतक कालावधी आणि 12 राशींवर कसा असेल प्रभाव, जाणून घ्या माहिती

Chandra Grahan 2025: यंदाचे शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्याच्या 6 की 7 तारखेला असणार आहे? चंद्रग्रहणातील सूतक कालावधी? चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर कसे परिणाम होणार आहे? जाणून घेऊया पंडित राकेश चतुर्वेदी यांच्याकडून माहिती...

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहण कधी आहे? सूतक कालावधी आणि 12 राशींवर कसा असेल प्रभाव, जाणून घ्या माहिती

Chandra Grahan 2025 Start And End Time: पंचांगानुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी असणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण (Purnima Lunar Eclipse)  संपूर्ण भारतासह जगभरामध्ये दिसणार आहे.  ज्योतिषांच्या मते, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहे. 7 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रग्रहणास कधी सुरुवात होणार आहे? ग्रहणाचा काळ कधी संपणार आहे? सूतक काळ कधी सुरू होईल? चंद्रग्रहणाचा जगासह तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल? याबाबत पंडित राकेश चतुर्वेदी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया...

चंद्रग्रहणाची वेळ  (Chandra Grahan Time)

पंचांगानुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025(रविवार) रोजी असणार आहे. त्याचा सूतक काळ 9 तासांपूर्वी म्हणजे दुपारी 12:57 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण रात्री 9:58 वाजता सुरू होईल 8 सप्टेंबरला 01:26 (AM) वाजता संपेल. 
 

Latest and Breaking News on NDTV

चंद्र ग्रहणाचा जगावर कसा असेल प्रभाव 

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ग्रहणाचा प्रभाव केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर पाहायला मिळणार आहे. यावेळेस चंद्र कुंभ राशीमध्ये असल्याने विष योग निर्माण होत असून राहु ग्रहासह युती करत आहे. यामुळे मोठ्या शक्तींमध्ये संघर्ष, लोकांच्या नात्यांमध्ये तणाव आणि मानसिक त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे मानव आणि प्राण्यांमध्ये काही प्रकारचे संसर्गजन्य रोग तसेच पाण्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या ग्रहणाचा भारतीय राजकारणावरही खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे चंद्रग्रहण येत्या निवडणुकीत सत्ता परिवर्तनाचे कारण देखील बनू शकते.

चंद्र ग्रहणाचा 12 राशींवर कसा असेल परिणाम?

मेष रास (Aries)

चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायामध्ये सकारात्मक बदलास कारणीभूत ठरेल. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत, पण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीकरिता हे चंद्रग्रहण मिश्र स्वरुपातील फळ देणारे ठरणार आहे. वैवाहिक जीवनात काही आव्हाने येऊ शकतात. नातेसंबंधांबाबत संयम बाळगावा.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीकरिता चंद्रग्रहण शुभ फळ देणारे असेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीकरिता चंद्रग्रहण थोडेसे प्रतिकूल ठरणार आहे. त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरुन तणाव वाढू शकतो. कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि संयम बाळगावा.  

Latest and Breaking News on NDTV

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण करिअर-व्यवसायासाठी शुभ ठरणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये लाभ मिळतील, पण वैयक्तिक आयुष्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अहंकारही टाळा.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण  शत्रूंवर विजय आणि कामाच्या ठिकाणी यश देणारे ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी यामुळे शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. 

Lunar Eclipse 2025: वर्षातले शेवटचे चंद्र ग्रहण; सूतक कधी लागणार? जाणून घ्या तारीख आणि वेळ

(नक्की वाचा: Lunar Eclipse 2025: वर्षातले शेवटचे चंद्र ग्रहण; सूतक कधी लागणार? जाणून घ्या तारीख आणि वेळ)

तूळ रास (Libra)

चंद्रग्रहणाचा परिणाम तुमच्या कुटुंबावर आणि वैवाहिक जीवनावर दिसू शकतो. तूळ राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांबाबत काळजी राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

वाहन आणि प्रवासाद्वारे तुम्हाला फायदा मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनातही आनंद येऊ शकतो. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे.
 

Latest and Breaking News on NDTV

धनु रास (Sagittarius)

धुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ परिणाम देणारे ठरणार आहे. त्यांना नशिबाची साथ मिळेल. अडकलेले कार्य पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि कुटुंबामध्ये आनंद राहील.

मकर रास (Capricorn)

मकर राशीकरिता चंद्रग्रहणानंतर पैशांशी संबंधित सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. खर्च वाढू शकतात. कुटुंबीयांमध्ये संवाद ठेवावा आणि संयम बाळगावा. 

कुंभ रास (Aquarius)

चंद्रग्रहणामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आध्यात्मिक साधना आणि आत्मनिरीक्षणासाठी हा एक शुभ काळ मानला जाईल.

मीन रास (Pisces)

चंद्रग्रहणाचा मीन राशीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कर्ज किंवा गुंतवणूक विचारपूर्वक करावे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com