जाहिरात

Chandra Grahan 2025: वर्षातले शेवटचे चंद्र ग्रहण; सूतक कधी लागणार? जाणून घ्या तारीख आणि वेळ

Lunar Eclipse 2025: ग्रहण काळ अशुभ मानला जातो. या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, असा समज आहे.

Chandra Grahan 2025: वर्षातले शेवटचे चंद्र ग्रहण; सूतक कधी लागणार? जाणून घ्या तारीख आणि वेळ
मुंबई:

Lunar Eclipse 2025: या वर्षातील म्हणजेच साल 2025 मधील दुसरे चंद्र ग्रहण येत्या 7 सप्टेंबरला असणार आहे. भाद्रपद पौर्णिमेलाच हे चंद्र ग्रहण येत आहे.  विशेष म्हणजे याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात होत असल्याने ग्रहणाचा सूतक काळदेखील भारतात वैध ठरेल. भारतामध्ये चंद्र ग्रहण कधी सुरू होणार आहे याची अनेकांना कल्पना नसते. (Chandra Grahan Kadhi Ahe?) कोणत्याही ग्रहणाच्या समयी भारतातील अनेक मंडळी सूतक पाळत असतात. सूतकाची वेळ कधी सुरू होते याबद्दलही अनेकांना जाणून घ्यायची इच्छा असते. (Chandra Grahan Sutak Kiti Wajta Suru Hoil)  त्यामुळे आपण हे ग्रहण कधीपासून लागणार आहे आणि सूतक कधीपासून लागणार आहे, याबद्दलची सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.  

चंद्र ग्रहण कधी सुरू होईल? (When will the lunar eclipse occur?)

या वर्षीचे दुसरे चंद्र ग्रहण हे भाद्रपदातील पौर्णिेच्या दिवशी येत आहे. 7  सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार असून रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे. यंदाचे ग्रहण हे खग्रास चंद्र ग्रहण म्हणजेच पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे. या दिवशीच्या विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे चंद्र लालबुंद दिसणार असून याला ब्लड मून असेही म्हणतात. इतके सगळे खगोलीय योग एकत्र जुळून येत असल्याने हे चंद्र ग्रहण विशेष ठरणार आहे.  

(नक्की वाचा-  Vastu tips for money: पैसे हातात टिकत नाहीत, मग 'या' 10 वास्तु दोषांकडे लक्ष द्या, दुर्लक्ष केल्यास...)

भारतात सूतक काळ कधी असेल ? (From when will Sutak period be observed in India?) 

यंदाचे खग्रास चंद्र ग्रहण हे भारतातही दिसणार आहे. त्यामुळे भारतामधील अनेकांना या चंद्र ग्रहणासाठी सूतक काळ काय असेल याची उत्सुकता असते. ग्रहण लागण्याच्या 9 तासांपूर्वी सूतक लागते. 7 डिसेंबर रोजी सूतक दुपारी 12 वाजून 57 मिनिटांपासून लागेल. या काळात धार्मिक गोष्टी टाळल्या जातात. 

सूतकामध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या जातात? (What should not be done during Sutak period)

सूतक काळात पूजा केली जात नाही
मात्र या काळात मंत्रोच्चार केला जाऊ शकतो
सूतकामध्ये अन्नपदार्थ तयार करणे वर्ज्य मानले जाते
सूतक लागताच मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात
सूतकामध्ये कोणतीही शुभ कार्ये वर्ज्य मानली जातात
सूतकामध्ये गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो.  

(नक्की वाचा-  Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरात कोणतं चित्र लावालं? 5 चित्र अन् त्यांचे आश्चर्यजनक फायदे)

ग्रहण, सूतक आणि समज (Religious beliefs related to eclipse and Sutak period)

ग्रहण काळ अशुभ मानला जातो. या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, असा समज आहे.  त्यामुळे या काळात पूजा करणे टाळले जाते, त्याऐवजी देवाचे नामस्मरण, मंत्रजाप, हनुमान चालीसा आणि गीतेचे पठण करावे असे सांगितले जाते.  अनेक जण या काळात जेवण बनवतही नाही आणि काही खातही नाहीत.

पितृपक्ष आणि ग्रहण

7 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. त्याच रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी खग्रास चंद्र ग्रहण आहे. ग्रहणाच्या आधी 9 तास सूतक लागते. सूतकामध्ये पूजा-अर्चा करणे टाळले जाते. 7 डिसेंबर रोजी 12 वाजून 58 मिनिटांआधी श्राद्ध आणि तर्पण विधी करणे योग्य ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  
 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com