
Chandra Grahan 2025 Effect On Rashi: सप्टेंबर महिन्यातील 7 तारखेला वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण आहे. हे ग्रहण राजकारण, जागतिक अर्थव्यवस्था आणि सामाजिक चळवळीमध्ये मोठे बदल घडवून आणू शकते;असे म्हटलं जातंय. भारतासह जगाच्या सर्व भागात दिसणारे हे ग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण त्याच वेळेस शनि वक्री होईल आणि मंगळ-शनि समसप्तक योग देखील तयार होईल. चंद्र ग्रहणाचा संपूर्ण जगासह 12 राशींवर कसा परिणाम होईल आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घेऊया माहिती...
देशासह संपूर्ण जगावर ग्रहणामुळे काय परिणाम होऊ शकतात?(Chandra Grahan 2025 Effects In India)
- नैसर्गिक आपत्ती: भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी यासारख्या इत्यादी घटनांची शक्यता
- राजकारण: भारतात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
- जागतिक राजकारण: युरोप आणि आशियातील देशांमध्ये आर्थिक अस्थिरता
- भारत: विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता
ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्या (Chandra Grahan Rules For Pregnant Ladies)
- ग्रहणकाळामध्ये घरातच राहा.
- तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नये.
- मंत्रांचा जप करा किंवा राम नामाचे स्मरण करावे.
- ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी.
12 राशींवर चंद्र ग्रहणाचा कसा असेल प्रभाव (Chandra Grahan 2025 Effects On 12 Zodiac Signs)
ज्योतिषाचार्य डॉ. नीति शर्मा यांच्या मते, ग्रहण भीतीदायक नव्हे तर आत्मशुद्धी करण्याची संधी आहे. ग्रहण काळामध्ये जप, दान आणि पितरांचे स्मरण केल्यास ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळू शकते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळेल. ग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणत्या राशीने कोणता उपाय करावा? जाणून घ्या माहिती...
मेष रास
- प्रभाव: मानसिक तणाव, कामाच्या ठिकाण चढ-उताराची परिस्थिती निर्माण होऊ शकतात. आरोग्यावर परिणाम.
- उपाय: ग्रहणानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे.
वृषभ रास
- प्रभाव: कौटुंबिक वाद आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
- उपाय: पांढरे वस्त्र आणि दूध दान करावे. शुक्र मंत्राचा जप करावा.
मिथुन रास
- प्रभाव: नोकरी आणि व्यवसायात अनिश्चितता आणि मुलांशी संबंधित चिंता निर्माण होऊ शकते.
- उपाय: हिरवे कपडे परिधान करा, मूग आणि पैशांचे दान करा. बुध ग्रहास जल अर्पण करा.
कर्क रास
- प्रभाव: आरोग्यावर परिणाम होईल. मानसिक अस्थिरता जाणवण्याची शक्यता.
- उपाय: ग्रहणानंतर गंगाजलने आंघोळ करा, तांदूळ आणि दूध दान करावे.
सिंह रास
- प्रभाव: वैवाहिक जीवन आणि भागीदारीतील मतभेद होऊ शकतात.
- उपाय: ग्रहणानंतर शिवलिंगवर पाणी अर्पण करावे. सूर्य मंत्र “ॐ घृणि सूर्याय नमः” मंत्राचा जप करावा.
कन्या रास
- प्रभाव: कामामध्ये अडचण, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
- उपाय: दुर्गा सप्तशतीचे पठण करा, हिरव्या भाज्या आणि मूग दान करा.
तूळ रास
- प्रभाव: प्रेम संबंध आणि मुलांसंबंधित अडचणी.
- उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करा. मुलींना खीर आणि वस्त्र दान करावे.
वृश्चिक रास
- प्रभाव: कुटुंबामध्ये मतभेद आणि जमीन-मालमत्तेशी संबंधित तणाव.
- उपाय: ग्रहणानंतर पिंपळाच्या झाडास पाणी अर्पण करावे. लाल वस्त्र आणि मसूर डाळ दान करावी.
धनु रास
- प्रभाव: शिक्षण आणि प्रवासामध्ये अडथळे. भावांसोबत मतभेद होण्याची शक्यता.
- उपाय: विष्णु सहस्रनामाचे पठण करा. पिवळ्या रंगाची वस्तू आणि हळदीचे दान करा.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2025: चंद्रग्रहण कधी आहे? सूतक कालावधी आणि 12 राशींवर कसा असेल प्रभाव, जाणून घ्या माहिती)
मकर रास
- प्रभाव: आर्थिक नुकसान आणि मानसिक अस्वस्थता.
- उपाय: शनिदेवाच्या मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करा. तीळ आणि तेलाचे दान करा.
कुंभ रास
- प्रभाव: हे ग्रहण तुमच्या राशीत आहे. त्यामुळे आयुष्यात अचानक बदल, निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
- उपाय: ग्रहणानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तीळ, तेल आणि उडदाचे दान करावे.
मीन रास
- प्रभाव: मानसिक शांतीचा अभाव, झोपेची समस्या.
- उपाय: पितरांना नैवेद्य अर्पण करावा. तुळशीच्या रोपाजवळ दिवा प्रज्वलित करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world