Pune Chandra Grahan 2026 : आज ३ मार्च रोजी वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. दुपारी ३.२० मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६.४८ मिनिटांपर्यंत ग्रहण संपेल असं सांगितलं जात आहे. आज धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे. यंदाचं ग्रहण साध्या डोळ्यांनीही पाहता येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
चंद्रग्रहणाचा काय परिणाम होईल?
3 मार्चला होणारं चंद्रग्रहण भारतात दुपारी 3:20 वाजता सुरू झालं असून संध्याकाळी 6:47 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटे चालेल. ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरू झाला आहे. चंद्रग्रहणाचा कन्या, मीन, सिंह राशीवर सर्वाधिक परिणाम होणार असून या राशीच्या लोकांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. या काळात विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा शेअर बाजार आणि सोन्याच्या दरामध्येही चढ-उतारांचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुण्यात ६ मिनिटं दिसेल चंद्रग्रहण...
पुण्यात अवघी ६ मिनिटं चंद्रग्रहण दिसणार आहे. पुण्यात चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल, असं सांगितलं जात आहे. याचा अर्थ पुण्यात अवघी ६ मिनिटं चंद्रग्रहण पाहता येणार आहे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी आधीच गच्चीवर किंवा टेरेस येऊन उभं राहावं. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याने कशाचीही आवश्यकता लागणार नाही. मात्र आकाशात दिसणारा लाल रंगाचा चंद्र पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
चंद्रग्रहण कसं पाहू शकता?
आपल्या शहरातील चंद्रग्रहण स्पष्टपणे पाहण्यासाठी Timeanddate.com वर उपलब्ध सिटी लुकअप टूलचा उपयोग करू शकता. तर शहराचं नाव टाकताच स्थानिक वेळेची माहिती मिळेल.
चंद्रग्रहणाची लाइव्ह स्ट्रीमिंग...
तुम्ही चंद्रग्रहण ऑनलाइनही पाहू शकता. इटालियन खगोल भौतिकविद Gianluca Masi द्वारा संचालित वर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टवर या चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं थेट प्रसारण करेल. NASA च्या अधिकृत युट्यूब चॅनलवरही मोठ्या खगोलीत घटनांचं लाइव्ह स्ट्रीमिंग केलं जातं. याशिवाय Space.com आणि Drikpanchang.com सारख्या प्लॅटफॉर्मवरही लाइव्ह अपडेट्स आणि कव्हरेज उपलब्ध असेल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या खगोलीय घटनेचा आनंद घेऊ शकता.