जाहिरात

Blood Moon चं दृश्य अजिबात मिस करू नका, तुमच्या शहरात ग्रहण स्पष्टपणे दिसत नसेल तर काय कराल?

तुमच्या शहरात चंद्रग्रहण स्पष्ट दिसत नसेल तर काय कराल? येथे पाहा Live Streaming

Blood Moon चं दृश्य अजिबात मिस करू नका, तुमच्या शहरात ग्रहण स्पष्टपणे दिसत नसेल तर काय कराल?

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणाची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. यंदाच्या वर्षाचा सर्वात मोठा चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण जगात पाहता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता हा ब्लड मूड (Blood Moon 2026) च्या रुपात दिसणार आहे. भारतातील लोक यंदाचं चंद्रग्रहण पाहू शकणार आहेत.

भारतीय वेळेनुसार, ग्रहण दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल. मात्र त्यावेळी भारतात चंद्र दिसणार नाही. भारतात चंद्राचा उदय साधारण ६.२६ ते ६.३२ दरम्यान होईल आणि त्याच वेळी ग्रहणाचा अंतिम टप्पा सुरू होईल. ग्रहण तब्बल ६.४६ ते ६.४७ दरम्यान समाप्त होईल. म्हणजे भारतात चंद्रग्रहण केवळ १५ ते २० मिनिटांपर्यंत पाहता येईल.

चंद्रग्रहण सर्वात आधी अरुणाचल प्रदेशमध्ये दिसेल. येथील तेजू नगरमध्ये चंद्रोदय सायंकाळी ५ वाजून ३ मिनिटांवर होईल. त्यामुळे सर्वात आधी आज चंद्रग्रहण येथे पाहता येईल.

चंद्र लाल का दिसतो?

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्रामध्ये येते, तेव्हा पृथ्वीची छाया अम्ब्रा चंद्रमावर पडते, या परिस्थितीत पूर्ण चंद्रग्रहण होतं. मात्र यादरम्यान चंद्र पूर्णपणे लपत नाही. चंद्र तांब्या किंवा गडद लाल रंगात चमकत असल्याचं दिसतो, ज्याला सर्वसाधारण भाषेत ब्लड मून असंही म्हणतात.

नक्की वाचा - Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहण काळात आकाशात पाहू शकतो का? ज्योतिषाचार्यांकडून शुभ-अशुभ परिणाम जाणून घेऊया

याचं वैज्ञानिक कारण पृथ्वीच्या वायुमंडलात आहे. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो तेव्हा कमी तरंगलांबी असलेला लाल आणि नारिंगी प्रकाश चंद्रावर पोहोचतो. म्हणूनच ग्रहणाच्या वेळी चंद्र लाल दिसतो.

चंद्रग्रहण कसं पाहू शकता?

आपल्या शहरातील चंद्रग्रहण स्पष्टपणे पाहण्यासाठी Timeanddate.com वर उपलब्ध सिटी लुकअप टूलचा उपयोग करू शकता. तर शहराचं नाव टाकताच स्थानिक वेळेची माहिती मिळेल.

चंद्रग्रहणाची लाइव्ह स्ट्रीमिंग...

तुम्ही चंद्रग्रहण ऑनलाइनही पाहू शकता. इटालियन खगोल भौतिकविद Gianluca Masi द्वारा संचालित वर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टवर या चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं थेट प्रसारण करेल. NASA च्या अधिकृत युट्यूब चॅनलवरही मोठ्या खगोलीत घटनांचं लाइव्ह स्ट्रीमिंग केलं जातं. याशिवाय Space.com आणि Drikpanchang.com सारख्या प्लॅटफॉर्मवरही लाइव्ह अपडेट्स आणि कव्हरेज उपलब्ध असेल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या खगोलीय घटनेचा आनंद घेऊ शकता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com