Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात आज संपूर्ण दिवस सुतक, वेधकाळ सकाळी 6.20 वाजेपासून सुरू;वाचा 12 नियमांची यादी

Chandra Grahan 2026 Sutak Time: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज लागणार आहे. ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 6.20 वाजता सुरू झाला. या काळात कोणते काम करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Chandra Grahan 2026 Sutak Rules: चंद्रग्रहणाच्या सुतक काळाचे नियम"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सनातन परंपरेनुसार चंद्रग्रहणाच्या सुतक काळात पूजा-पाठ आणि शुभ कार्य करणे टाळले जाते
  • चंद्रग्रहणाच्या सुतक काळात देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करणे आणि त्यांना स्पर्श करणे टाळावे
  • सुतक काळात अन्न शिजवू नये,आधी शिजवलेले अन्न खाणे टाळावे. पण आजारी, गर्भवती, लहान मुलांना हा नियम लागू होत नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Chandra Grahan 2026 Sutak Time: सनातन परंपरेमध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण तसेच मृत्यूच्या वेळी सुतक लागते अशी मान्यता आहे. सुतक काळ हा अशुद्धतेचा काळ मानला जातो आणि या काळात पूजा-पाठ तसेच शुभ कार्य करण्यास मनाई असते. आज फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे, या ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 6.20 वाजता सुरू झाला आहे. ग्रहण संपेपर्यंत सुतक काळ पाळला जाईल. सुतक काळ मंगल कार्यांसाठी अशुभ मानला जातो, या काळात दोष टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये? अस प्रश्न तुम्हालाही पडला असेल त्याचे उत्तर जाणून घेऊया... 

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)

चंद्रग्रहणाच्या सुतक काळात चुकूनही करू नये ही कामं | Chandra Grahan 2026 Sutak Time | Chandra Grahan 2026 Sutak Kaal

  1. हिंदू मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाचे सुतक लागल्यानंतर देवी-देवतांच्या मूर्तीची पूजा करू नये किंवा त्यांना स्पर्श करू नये.
  2. सुतक लागल्यानंतर अन्न शिजवू नये तसेच आधी शिजवलेले अन्न खाऊ नये. पण हा नियम आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुले यांना लागू होत नाही.
  3. सुतक काळात शिजवलेल्या अन्नाऐवजी फळे इत्यादींचे सेवन करू शकता.
  4. आवश्यकता नसल्यास ग्रहण संपेपर्यंत घराबाहेर जाऊ नये.
  5. सुतक काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करू नये.
  6. सुतक काळात केस-दाढी कापू नये.
  7. सुतक काळात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये.
  8. सुतक काळ लागू लागल्यानंतर झोपू नये.
  9. वाद-विवाद करू नये तसेच कोणाबद्दल वाईट विचार करू नये.

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू 9 तास आधी सुरू, ज्योतिषी दीक्षितांनी सांगितलेले हे नियम पाळाच)

चंद्रग्रहणाच्या सुतक काळात काय करावे? | Chandra Grahan 2026 News

  1. हिंदू मान्यतेनुसार, सुतक लागल्यानंतर शक्य असल्यास आपल्या आराध्य देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करावा.
  2. सुतक काळ मंत्रजपासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या काळात केलेले जप अनेकपटीने पुण्य देते, अशी श्रद्धा आहे.
  3. चंद्रग्रहणाच्या सुतक काळात भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांच्या मंत्रांचा अधिकाधिक जप करणे शुभ फलदायी मानले जाते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)