- यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता सुरू होणार आहे.
- ग्रहणाच्या सुतक काळाची सुरुवात सकाळी 6.20 सुरुवात झालीय.
- ग्रहणापूर्वी घरातील भग्न मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन करणे आणि बंद पडलेली घड्याळे दुरुस्त करावे.
Chandra Grahan 2026 Vastu Tips: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी लागणार आहे. हे ग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6.46 वाजता समाप्त होईल. ग्रहण भारतातही दिसणार असल्याने सुतक काळ पाळवा लागेल. परंपरेनुसार सुतक साधारण 9 तास आधी सुरू होतो म्हणजे आज सकाळी 6.20 वाजेपासून सुतक काळ सुरू झाला आहे. या काळात घरातील आणि वातावरणातील ऊर्जा बदलते, असे म्हणतात. त्यामुळे काही वास्तु उपाय ग्रहणापूर्वी करणे शुभ मानले जाते. ग्रहण काळादरम्यान कोणती काळजी घ्यावी, याबाबत ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया...
ग्रहणाचा वेळ आणि सुतक काळ (Lunar Eclipse 2026 Time and Sutak Kaal)
ग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा परिणाम मानसिक स्थिती आणि घरातील वातावरणावर होऊ शकतो, असे म्हणतात. म्हणून ग्रहणापूर्वी वास्तुशी संबंधित काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)

ग्रहणापूर्वी घरातील कोणत्या गोष्टी बाहेर काढाव्या? (What to Remove Before Chandra Grahan 2026)
- होळी सणानिमित्त घराच्या साफसफाईदरम्यान तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती घरात ठेवू नये. त्यांचे विधीपूर्वक विसर्जन करणे योग्य मानले जाते. बंद पडलेली घड्याळे आयुष्यातील स्थिरतेचे प्रतीक मानली जातात, त्यामुळे ती दुरुस्त करा किंवा त्यांची विल्हेवाट लावा.
- कोमेजलेली किंवा सुकलेली झाडे नकारात्मकता वाढवतात, म्हणून त्यांच्या जागी हिरवीगार झाडे लावावी.
- घराच्या मुख्य दरवाजाजवळ जुने बूट किंवा भंगारवस्तू ठेवू नये. राहूच्या प्रभावापासून बचावासाठी छत आणि कोपऱ्यांची विशेष साफसफाई करणे आवश्यक मानले गेले आहे.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय टाळावे, वेधकाळ, उपाय जाणून घ्या दाते पंचांगानुसार माहिती)
हे उपाय करणं महत्त्वाचं का आहे? (Why This Is Important)हे ग्रहण मंगळवारी (3 मार्च) लागत असून भारतात दिसणार असल्याने धार्मिकदृष्ट्या त्याचे महत्त्व अधिक आहे. परंपरा आणि श्रद्धेनुसार सावधगिरी बाळगणे मानसिक शांतता तसेच सकारात्मकतेसाठी आवश्यक मानले जाते. ग्रहणास घाबरण्याची आवश्यकता नाही तर सजग राहणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता, सतर्कता आणि सकारात्मक विचार हेच सर्वात मोठे उपाय आहेत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world