Chicken Side Effects: चिकन हे प्रोटीनचे एक चांगले स्त्रोत आहे आणि बऱ्याचदा ते लाल मांसपेक्षाही अधिक आरोग्यदायी मानले जाते. पण चिकनचा प्रत्येक भाग तुमच्या शरीरासाठी चांगला असतोच असे नाही. संशोधनानुसार चिकनच्या काही भागांमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामध्ये हानिकारक बॅक्टेरियाही असू शकतात किंवा चिकनच्या आसपासच्या वातावरणातील विषारी घटक-घाण त्या भागांमध्ये जमा होऊ शकतात. हे भाग नियमितपणे खाल्ल्यास संसर्ग, पचनाशी संबंधित समस्या किंवा दीर्घकालीन आजार होऊ शकतात. जर तुम्ही वारंवार चिकन खात असाल तर त्याचे कोणते भाग खाणे टाळले पाहिजे आणि सुरक्षित भाग कोणत्या पद्धतीने शिजवले पाहिजे, हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जेणेकरून आजारांचा धोका कमी होईल.
चिकनचे कोणते भाग खाऊ नये? | 10 Chicken Parts You Should Never Eat
1. चिकनची त्वचा
कुरकुरीत (क्रिस्पी) चिकन स्किन अनेकांना आवडत असली तरी हा चिकनचा सर्वात आरोग्यदायी भाग नाही. त्वचेमध्ये प्रामुख्याने चरबी (फॅट) असते, जी वारंवार खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
2. चिकनची फुफ्फुसे
बहुतांश खाद्यसंस्कृतींमध्ये चिकनची फुफ्फुसे खाल्ली जात नाहीत, पण काही पारंपरिक पदार्थांमध्ये त्यांचा वापर केला जातो. फुफ्फुसांबाबत चिंतेची बाब म्हणजे त्यांच्यामध्ये असे सूक्ष्मजीव (माइक्रो ऑर्गेनिज्म) आणि पॅरासाइट्स असू शकतात जे जास्त तापमानावर शिजवल्यानंतरही नष्ट होत नाहीत. यामुळे ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
3. चिकनचे डोके
कधीकधी रस्सा (शोरबा) किंवा पारंपरिक सूपमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिकनच्या डोक्यामध्ये दूषित अन्न किंवा वातावरणातून शोषून घेतलेल्या कीटकनाशकांचे (पेस्टिसाइड्स) अवशेष असू शकतात. काळानुरूप या गोष्टी पेशींमध्ये (टिश्यू) जमा होऊ शकतात आणि असे डोके खाल्ल्यास दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
4. चिकनची आतडी
चिकनच्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि इतर रोगजंतू (पॅथोजन) असतात, जे अगदी चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यानंतरही पूर्णपणे काढून टाकणे कठीण असते.
5. चिकनचे पाय (चिकन लेग)
काही संस्कृतींमध्ये चिकन लेग हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे आणि योग्य पद्धतीने शिजवल्यास ते चवदारही लागू शकतात. पण संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. कारण ते सतत जमिनीच्या संपर्कात असतात, ज्यामुळे त्यांच्या भेगांमध्ये घाण, बॅक्टेरिया आणि इतर अशुद्धता जमा होऊ शकतात.
(नक्की वाचा: Beer Nutrition: Zero Fat आणि व्हिटॅमिन B12 युक्त बिअर आरोग्यासाठी खरंच फायदेशीर? डॉ. भाटींनी दिली मोठी माहिती)
6. चिकन कलेजी
चिकनच्या हृदयाच्या भागामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. पण यामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे अंश देखील असू शकतात, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. चिकन कलेजीचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात.
7. गिजार्ड
गिजार्ड हे पक्ष्याच्या पोटासारखे काम करते आणि यामध्ये बऱ्याचदा अन्न बारीक करण्यासाठी मदत करणारे लहान दगड आणि खडे असतात. जर हे व्यवस्थित स्वच्छ केले नाही, तर त्यात हानिकारक जीवाणू किंवा घाण तशीच राहू शकते.
(नक्की वाचा: Health News: तुम्हीही गॅस, शिंक, जांभई रोखून धरताय? या सवयीमुळे जडतील गंभीर आजार)
8. चिकनची मान (नेक)
चिकनच्या मानेचा वापर सामान्यतः सूप आणि स्टॉक बनवण्यासाठी केला जातो, पण या भागात जीवाणू वेगाने वाढू शकतात. फक्त उकळल्याने नेहमीच सर्व हानिकारक जंतू (पॅथोजन) मरतात असे नाही, म्हणूनच मान स्वच्छ धुणे आणि ती बराच वेळ व्यवस्थित शिजवणे अत्यंत गरजेचे आहे.
9. विंग टिप्स (पंखांची टोके)
विंग टिप्समध्ये मुख्यतः त्वचा आणि हाडेच असतात. यामध्ये मांसाचे किंवा पोषणतत्त्वांचे प्रमाण अगदी नगण्य असते.
10. बोन मॅरो
चिकनच्या हाडांचा वापर पोषक तत्त्वांनी समृद्ध सूप किंवा रस्सा (शोरबा) बनवण्यासाठी केला जात असला, तरी हाडांच्या आतील मॅरोमध्ये काही वेळा रक्ताचे अंश राहू शकतात जे पूर्णपणे शिजत नाहीत. जर हाडे बराच वेळ व्यवस्थित शिजवली नाहीत, तर यामुळे संसर्गाचा (contamination) थोडा धोका उद्भवू शकतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)