Is Beer Good For Health: आपल्या देशात अल्कोहोलिक ड्रिंक्सचे नाव ऐकताच अनेकदा नाक-तोंड मुरडले जाते आणि या ड्रिंक्समुळे आरोग्यावर होणाऱ्या सर्व दुष्परिणामांबाबत बोलले जाते. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. तर मग जर तुम्ही बिअरसारखे ड्रिंक खूप जास्त किंवा ठराविक प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पीत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की मर्यादित प्रमाणात वाईन प्यायल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो, म्हणून अनेक लोक विचार करतात की बिअर देखील आरोग्यासाठी चांगली असू शकते का? बिअरमधील पोषणतत्त्व तसेच फायदे आणि नुकसानीबाबत जाणून घ्या माहिती...
लोक हजारो वर्षांपासून बिअर पीत आहेत. बिअर हे आवडते आणि लोकप्रिय अल्कोहोलिक ड्रिंक आहे. बिअर मोठ्या प्रमाणावर पसंत करण्यामागील कारण म्हणजे तिची काही वैशिष्ट्ये. जसे की बिअर धान्याच्या दाण्यांचे यीस्ट, हॉप्स आणि चव वाढवणाऱ्या इतर गोष्टींसोबत मिसळून मग फर्मेंट करून बनवली जाते. यासोबतच बिअरमध्ये 4–6 टक्के अल्कोहोल असते.
बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती असते?
हे प्रमाण प्रत्येक देशानुसार वेगळे असू शकते. सामान्यतः बिअरमध्ये 4–6 टक्के अल्कोहोल असते. पण काही ब्रँड्समध्ये हे प्रमाण 0.5% ते 40% पर्यंत असू शकते.
बिअरमधील पोषणतत्त्व | Beer Nutrition
बिअरला अनेकदा 'झीरो कॅलरी' मानले जात असले तरीही त्यात काही खनिजे (मिनरल्स) आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) असतात. येथे दिलेल्या टेबलमध्ये जाणून घ्या तुमच्या एक ग्लास बिअरमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो...
| पोषक घटक | स्टँडर्ड बिअर | लाइट बिअर |
| कॅलरीज | 153 | 103 |
| प्रोटीन | 1.6 ग्रॅम | 0.9 ग्रॅम |
| फॅट्स | 0 ग्रॅम | 0 ग्रॅम |
| कार्ब्स | 13 ग्रॅम | 6 ग्रॅम |
| मॅग्नेशिअम | दैनंदिन गरजेच्या 5% | दैनंदिन गरजेच्या 4% |
| फॉस्फरस | दैनंदिन गरजेच्या 4% | दैनंदिन गरजेच्या 3% |
| सेलेनियम | दैनंदिन गरजेच्या 4% | दैनंदिन गरजेच्या 3% |
| व्हिटॅमिन B12 | दैनंदिन गरजेच्या 3% | दैनंदिन गरजेच्या 3% |
| पॅन्टोथेनिक ॲसिड | दैनंदिन गरजेच्या 3% | दैनंदिन गरजेच्या 2% |
| अल्कोहोल | 13.9 ग्रॅम | 11 ग्रॅम |
Source: (1, 2 (fdc.nal.usda.gov):
स्पष्ट आहे की दोन्ही प्रकारच्या बिअरमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, थायमिन, लोह आणि झिंक असते. कारण बिअरमध्ये व्हिटॅमिन बी आणि खनिजे असतात. आता तुम्ही विचार करत असाल हे कुठून आले? तर विसरू नका की बिअर धान्य आणि यीस्टपासून बनवली जाते. विशेष बाब म्हणजे लाइट बिअरमध्ये नेहमीच्या बिअरच्या तुलनेत जवळपास दोन-तृतीयांश कॅलरीज आणि थोडे कमी अल्कोहोल असते.
थोडक्यात सांगायचे तर
बिअरमध्ये अनेक प्रकारचे बी-व्हिटॅमिन आणि खनिजे असतात कारण ती धान्य आणि यीस्टपासून बनते. पण तरीही फळे आणि भाज्याच यासाठी उत्तम स्रोत आहेत. तुमच्या रोजच्या पोषक तत्त्वांची गरज भागवण्यासाठी तुम्ही बिअरचा वापर करू नये.
(नक्की वाचा: सावधान! कोल्ड्रिंक्स आणि ज्युस सतत पिण्याची सवय धोकादायक; वैज्ञानिकांनी दिला इशारा)
बिअरचे फायदे | Beer Benefits
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यामुळे जर कमी ते मध्यम प्रमाणात बिअर प्यायली तरीही आरोग्याला त्याचे काही प्रमाणात फायदे होऊ शकतात.
1. हृदय
अनेक संशोधनामध्ये आढळलंय की, कमी प्रमाणात बिअर किंवा दारू प्यायल्याने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. जास्त वजन असलेल्या 36 प्रौढांवर केलेल्या 12 आठवड्यांच्या अभ्यासात असे आढळलंय की मध्यम प्रमाणात बिअर प्यायल्याने HDL कोलेस्टेरॉलचे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म सुधारले.
NOTE: हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे संभाव्य फायदे केवळ कमी प्रमाणात प्यायल्यानेच मिळतात आणि अनेकदा असे पाहिले गेले आहे की एकदा पिण्यास सुरुवात केल्यावर ही सवय थांबवणे शक्य होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की जास्त दारू प्यायल्याने हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
2. ब्लड शुगरमध्ये (रक्तातील साखरेमध्ये) सुधारणा
कमी प्रमाणात बिअर प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल सुधारू शकते. संशोधनातील माहितीनुसार मद्यपानामुळे मधुमेहाचा धोका, इन्सुलिन रेजिस्टन्स आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा एकूण धोका कमी होतो.
NOTE: खूप जास्त दारू प्यायल्याने मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो आणि संभाव्य फायदा खूप जास्त साखर असलेल्या बिअरवर लागू होत नाही.
3. हाडांसाठी उत्तम
हाडांची घनता वाढण्यास मदत होऊ शकते. कमी ते मध्यम प्रमाणात बिअर प्यायल्याने पुरुषांमध्ये आणि मेनोपॉजनंतर (रजोनिवृत्तीनंतर) महिलांमध्ये हाडे मजबूत होऊ शकतात.
4. डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंशाचा) धोका
कमी ते मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने डिमेंशियाचा धोका कमी होऊ शकतो. पण हो, जास्त मद्यपान केल्याने याउलट धोका वाढूही शकतो.
कोणत्या लोकांनी बिअर पिणे टाळावे?
आता प्रश्न असा पडतो की जेव्हा बिअरमध्ये इतके गुण आहेत आणि ती पिण्याचे फायदे असूनही बिअर पिण्यास मनाई का केली जाते. तर बिअर पिण्याच्या संभाव्य दुष्परिणामांबाबतही माहिती जाणून घेऊया. या संदर्भात डॉक्टर समीर भाटी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, काही लोकांनी तर बिअरला हातही लावता कामा नये. जेव्हा आम्ही त्यांना विचारले की असे लोक कोण आहेत, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले-
जास्त कॉफी पिणारे लोक
जर तुम्ही दिवसातून अनेक कप कॉफी पीत असाल तर तुम्ही बिअर पिणे टाळले पाहिजे. कारण कॉफी शरीराला डिहायड्रेट करते (पाण्याची कमतरता निर्माण करते) आणि त्यात संध्याकाळी घेतलेली बिअर भर घालते. यामुळे तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता.
तहान भागवण्यासाठी बिअर पिणारे लोक
लोकांना वाटते की बिअर प्यायल्याने कदाचित माझ्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल, पण तो एक खूप मोठा गैरसमज आहे, कारण अल्कोहोल देखील शरीराला डिहायड्रेट करते.
डिहायड्रेशनचा अर्थ असा आहे की शरीरातून पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होईल, विशेषतः जेव्हा कोणी दारू वगैरे जास्त प्रमाणात पितात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world