जाहिरात

Dress Loop Uses:कपड्यांमध्ये असणाऱ्या या पट्ट्यांचा उपयोग काय? तुमच्या एका चुकीमुळे नवे महागडे कपडे होतील खराब

How to Hang Clothes Properly: नवीन कपडे खरेदी केल्यानंतर त्यांच्या आत असलेले पारदर्शक लुप्स अनेकजण कापून टाकतात. पण कपड्यांचा आकार आणि परफेक्ट फिटिंग टिकवून ठेवण्यासाठी हे लूप्स कसे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या.

Dress Loop Uses:कपड्यांमध्ये असणाऱ्या या पट्ट्यांचा उपयोग काय? तुमच्या एका चुकीमुळे नवे महागडे कपडे होतील खराब
"Fashion Tips: कपड्यांमधल्या ट्रान्सपरंट पट्ट्यांचं काम माहितीये का?"
Veronica Coceban Instagram

How to Hang Clothes Properly: नवीन कपडे खरेदी करून आणतो आणि परिधान करतो, तेव्हा बहुतांश वेळेस कपड्यांचं फिटिंग, रंग सर्वच अगदी परफेक्ट वाटतं. पण बऱ्याचदा काही दिवस कपडे वापरल्यानंतर त्यांचा आकार (शेप) आणि रंग सर्वकाही बिघडू लागतं. खुंटीला टांगल्यानं कपड्यांवर वेगळाच फुगवटाही तयार होतो, जो सहजासहजी जात नाही. त्यामुळे कपडे लवकर खराब होतात. तर मग आता कपडे ठेवायचे कसे? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का, तर मग हे कपडे खुंटीला लटकवण्यासाठी कपड्यांमध्येच लुप दिलेले असते. ज्यामुळे कपड्यांचा आकार आणि फिटिंग खराब होणार नाही. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Unsplash

ट्रान्सपरंट लुप्सचे नेमके काम काय?

नवीन ड्रेस, टॉप किंवा गाऊन खरेदी करताना तुम्हीही त्यांच्या आतमध्ये लावलेले ट्रान्सपॅरेंट (पारदर्शक) लुप्स पाहिले असतील. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे अखेर कशासाठी दिलेले असतात? सहसा लोक हे लुप्स निरुपयोगी समजून कापून टाकतात. पण हे लुप्स कपड्यांचा आकार आणि फिटिंग उत्तम प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी दिलेले असतात.

हे ट्रान्सपरन्ट लुप्स कपड्याच्या स्ट्रॅप किंवा खांद्याच्या भागाजवळ आतील बाजूला असतात. कपडे हँगवर योग्य पद्धतीने लटकवण्यासाठी याचा वापर केला जातो. दुकानांमध्ये जेव्हा एखादा ड्रेस हँगरवर लावला जातो, तेव्हा हे लुप्स हँगरच्या हुकमध्ये अडकवले जातात, ज्यामुळे कपडे घसरून खाली पडत नाही.

(नक्की वाचा : How To Relieve Tired Feet At Home: पायांचा थकवा, सूज आणि ताण होईल छुमंतर! फॉलो करा 20 मिनिटांचा घरगुती फॉर्म्युला)

विशेषतः स्लीव्हलेस ड्रेस, गाऊन, ऑफ-नेक आणि मोठ्या गळ्याचे कपडे हँगरमध्ये अडकवताना जास्त अडचण येते. तर मऊ कपडे हँगरवरून घसरतात. ट्रान्सपरन्ट लुप्स हीच अडचण दूर करण्यासाठी लावले जातात, जे कपड्यांचा आकार टिकवून ठेवण्यासही मदत करतात.

लुप्सचा वापर कशासाठी केला जातो?

  • कपड्यांना हँगरवर टिकवून ठेवणे खासकरून सॅटिन किंवा रेशीम यासारख्या मऊ कपड्यांसाठी लुप्सचा फायदेशीर असतात.  
  • कपडे कपाटात ठेवताना ते चुरगळू नये यासाठी मदत मिळते.
  • लुप्स केवळ कपडे हँगरला लटकवण्याच्या सोयीसाठी कपड्यांना जोडले जातात.
  • जर तुम्हाला लुप्समुळे त्रास होत असेल किंवा घालताना ते टोचत असतील, तर तुम्ही ते कापून टाकू शकता. यामुळे कपड्यांच्या कटिंगवर किंवा टिकाऊपणावर कोणताही परिणाम होणार नाही. यात एकमेव तोटा हाच आहे की, मऊ कपडे (सॅटिन, रेशीम, मऊ लोकर) हँगरमध्ये अडकवणे कठीण जाते; म्हणूनच हे लुप्स लावले जातात.  

लुप्सचा कसा करावा वापर?

@veronicacoceban/Instagram

@veronicacoceban/Instagram

लुप्सचा वापर कसा करावा?

  • जर तुम्हालाही तुमच्या कपड्यांचं फिटिंग योग्य ठेवायची असेल, तर कपडे हँगरवर किंवा लुप्सचा वापर करा. 
  • अनेकदा लुप्स कपडे परिधान केल्यानंतर बाहेर दिसतात किंवा घालताना त्रास देतात, अशा वेळेस तुम्हाला गरज वाटत असल्यास ते काप शकतात.  
  • पण कपड्यांचा परफेक्ट शेप टिकवून ठेवण्यामागे लुप्स महत्त्वाचे असतात. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com