जाहिरात

Deep Amavasya 2025 Wishes: अंध:कार दूर करणारे दिवे, जीवनात घेऊन येवो तेजस्वी क्षण! दीप अमावस्येच्या पाठवा खास शुभेच्छा

Deep Amavasya 2025 Wishes: दीप अमावस्येनिमित्त नातेवाईक-मित्रपरिवारासह प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा.

Deep Amavasya 2025 Wishes: अंध:कार दूर करणारे दिवे, जीवनात घेऊन येवो तेजस्वी क्षण! दीप अमावस्येच्या पाठवा खास शुभेच्छा
"Deep Amavasya 2025 Wishes: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा"

Deep Amavasya 2025 Wishes In Marathi: दीप अमावस्या म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक. आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करुन त्यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करुन नैवेद्य अर्पण केले जाते. या दिवशी पूजा केल्यास आरोग्य, दीर्घायुष्य लाभते, असे म्हणतात. दीप पूजनाच्या (Deep Amavasya 2025 Wishes) निमित्ताने प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.  

दीप अमावस्या 2025 हार्दिक शुभेच्छा (Deep Amavasya 2025 Wishes In Marathi)

1. दीप अमावस्येच्या साजऱ्या रात्री

प्रकाशू दे अंतरीची सारी वस्ती

दूर होवो दुःख, वेदना अन् कष्ट, दूर होवो अंधार

नवा उजेड घेऊन येवो संध्याकाळ 

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

2. अंधाराचा होवो समूळ नाश

दिव्यांच्या तेजात मिळो आशा खास

साजरी करा ही अमावस्या

प्रेम, शांती आणि सुखांची जीवनयात्रा

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

3. दिव्यांची पूजा करा  

मनाच्या कोपऱ्यात उजेड भरा

अंधार पळो, नवे स्वप्न जागो

दीप अमावस्येला जीवनातील अंधार दूर होवो

दीप पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. दिव्यांची रात्री, शांततेची वेळ

प्रकाशू दे आशेची पणती  

संस्कारांचा गंध दरवळो आज

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा खास!

5. घराघरात उजळू दे दीप

जन्मो नवे विचार, होवो स्नेहदीप

अंध:कार दूर करू या एकत्र सारे

दीप पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. तेल, वात आणि शुभतेचे तेज

प्रकाश देई जीवनाला वेगळा वेग

दिव्यांच्या संगतीत होऊ नवे सूर

दीप अमावस्येच्या सकारात्मक आठवणी भरपूर!

Deep Amavasya 2025 Wishes

7. अमावस्येची रात्र खास

उजळू दे घर, मन, आणि आकाश

सुख, समाधान, शांती लाभो सर्वांना

दीप पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

8. उजळल्या वाटा, शांत-समृद्ध झाले घर

मनात भरले नवे तेज

अंध:कार झाला मागे सारा

दीप अमावस्या घेऊन आली नवा तारा

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

9. दिव्यांची पूजा करा साजरी

मनाच्या अंधाराला उजळण्याची तयारी

सण साजरा होई दिव्यांच्या संगतीत

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

10.  तेलामध्ये चिंतन, वातीमध्ये श्रद्धा

दिव्यांमध्ये साठवले प्रेम आणि निष्ठा

अंधाराचा होवो संपूर्ण पराजय

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा खास!

11. जग उजळो ज्ञानाच्या तेजाने

मन भरू दे प्रेमाच्या सागराने

साजरी होवो ही दीपांची रात्र

तुमच्या आयुष्यात सुरू होवो सुखांची नवी यात्रा

दीप पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

12.  प्रकाशमय होवो तुमचे जीवन

अमावस्येची रात्र देवो नवे दर्शन

दूर होवो चिंता, आयुष्यात येवो नवा प्रकाश

शुभ दीप अमावस्या 2025!

Deep Amavasya Naivedya : दीप अमावस्येला दिवे खाण्याची प्रथा काय आहे? कणकेचे की बाजरीचे कुठल्या दिव्याचा नैवेद्

नक्की वाचा - Deep Amavasya Naivedya : दीप अमावस्येला दिवे खाण्याची प्रथा काय आहे? कणकेचे की बाजरीचे कुठल्या दिव्याचा नैवेद्

13.  अंधार मिटवणारी ही रात्र खास

मनात नव्या स्वप्नांचा गंधवास

जगणं होवो अधिक प्रकाशमय

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

14. अंध:कार दूर करणारा सण

घेऊन येवो तेजस्वी क्षण

दीप अमावस्या ठरो मंगलमय

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

15. एक दिवा ज्ञानाचा

एक दिवा प्रेमाचा

एक दिवा सुखाचा

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

16.  काळोख दूर होईल आज

प्रेम आणि शांततेचा येईल साज

तेल दिव्यांच्या प्रकाशांनी सजले अंगण

दीप अमावस्येच्या शुभेच्छा!

17. दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com