
Deep Amavasya 2025 : आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या दिव्यांची या दिवशी पूजा-अर्जा केली जाते. वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात आज त्या दिव्यांचा सण म्हणून दीप अमावस्या महाराष्ट्रभरात साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीत दिवा हा ज्ञान, शुद्ध, प्रकाश याचा प्रतीक मानला जातो. नकारात्मकतेतून बाहेर काढत तो तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा घेऊन येत असतो. त्यामुळेच आपल्याकडे देवळात सकाळी आणि सायंकाळी दिवा लावण्याची प्रथा आहे.
या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन, त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात. काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळही दिवे लावले जातात.दीप पूजनामुळे (Deep Pujan 2025) घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो, असेही म्हणतात.
(deep amavasya naivedya kay dyal)
दिव्यांचा नैवेद्य...(deep amavasya kankeche dive)
या दिवशी कणकेचे (wheat flour lamp) किंवा बाजरीचे दिवे बनविण्याची प्रथा आहे. कणकेच्या (गव्हाचं पिठ) पिठात गुळाचं पाणी घालून तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे दिवे केले जातात. हे दिवे इडली पात्र किंवा कुठल्याही भांड्याला तूप लावून उकडून घेतले जातात. आणि हे दिवे नैवेद्य म्हणून दाखवला जातो. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात बाजरीचे दिवे तयार करण्याची परंपरा आहे. यामध्ये गव्हाऐवजी बाजरीचं पीठ, गूळ वापरला जातो. दिवे नीट वळता यावेत यासाठी यात ज्वारीचं पीठ घातलं जातं. आजही ग्रामीण भागात बाजरीचे दिवे तयार केले जातात.
नक्की वाचा - Deep Amavasya 2025 Wishes: अंध:कार दूर करणारे दिवे, जीवनात घेऊन येवो तेजस्वी क्षण! दीप अमावस्येच्या पाठवा खास
हिंदू संस्कृतीत सणांच्या दिवशी गोड करण्याची पद्धत आहे. त्यानुसार दीप अमावस्येला गोड म्हणून गूळ घातलेला दिवा खाण्याची प्रथा आहे. या दिव्यात गुळाचा वापर केला जातो, जो पावसाच्या दिवसात शरीराला उर्जा देतो. याशिवाय हे पदार्थ उकडून खाल्ले जातात, जे शरीराला फायदेशीरच ठरतात. कणकेपेक्षाही बाजरीचे उकडलेले दिवे अधिक पौष्टिक असल्याचं म्हटलं जातं.
दीप अमावस्येचा मुहूर्त (2025) (Deep Amavasya 2025 Date And Time)
प्रारंभ तिथी : 24 जुलै 2025, गुरुवार, सकाळी 7:28 वाजता
समाप्ती तिथी: 25 जुलै 2025, शुक्रवार, सकाळी 9:17 वाजता
अमृत काळ: 24 जुलै 2025, दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 3:00 वाजेदरम्यान असेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world