
Dhanteras 2025 Wishes In Marathi: दीपोत्सवास शुभारंभ झालाय. दिवाळी सणातील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी महालक्ष्मी माता, भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी भाविक या दिवसाची आतुरतेने प्रतीक्षा करतात. धनत्रयोदशीला विधीवत पूजा केल्यास लक्ष्मीमाता आशीर्वादाचा वर्षाव करते, असे म्हणतात. धनत्रयोदशीनिमित्त प्रियजनांना मंगलमय शुभेच्छा नक्की पाठवा...
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा | शुभ धनतेरस 2025| Happy Dhanteras 2025 Wishes In Marathi | Happy Dhanteras 2025 Wishes
1. आरोग्य हेच खरे धन
हेच असो सर्वांचे जीवनमान
लक्ष्मीचा निवास असो घरी
धनतेरस साजरा करूया उत्साहाने
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
2. प्रेम, आनंद, आरोग्य लाभो
दुःख, संकट दूर जावो
धनत्रयोदशीचा दिवस उजळू दे
तुमचे नशीब सोन्यासारखे झळको!
हॅपी धनत्रयोदशी 2025!
3. लक्ष्मी येवो सोनपावलांनी
संपत्ती आणि सौख्य घेऊन
आरोग्य लाभो उत्तम
धनत्रयोदशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
Happy Dhanteras 2025
4. धनासह प्रेमाचा खजिना लाभो
शांती आणि समाधान मिळो अपार
हृदयात असो उत्साह
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dhanteras 2025
5. चांदी- सोनं, नवे वस्त्र
मनात आनंद आणि आशा
निरोगी आरोग्याची साथ लाभो
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!
6. नवे स्वप्न, नवा दिवस
नवा प्रकाश, नवी आस
धनतेरस नात्यांचा उत्सव
प्रेमाने साजरा करू हा दिवस खास!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dhanteras 2025
(नक्की वाचा: Happy Dhanteras 2025 Wishes: तुमचे भाग्य उजळो, महालक्ष्मी मातेची कृपा होवो; धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा)
7. संपत्तीसह समाधानाची ओढ
मनात असो श्रद्धा आणि प्रेम
धनतेरस साजरा करूया हसत-खेळत
आयुष्य असो गोड आठवणींनी व्यापलेले
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. सोने, चांदी, नवे वस्त्र
घरा-घरात उजळो प्रकाश दिव्यांचा
धन, आरोग्य लाभो अपार
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
9. धनाची प्राप्ती, आरोग्याचे वरदान
कष्टातून मिळो यशाचे स्थान
प्रेमाच्या वाटेवर सदा चालावे
उत्साहात धनत्रयोदशी साजरी करा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
10. समृद्धीचा असो अखंड प्रवाह
प्रेम आणि विश्वास असो तुमच्या साथीला
स्नेहाचा दीप प्रज्वलित करूया
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Dhanteras 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world