
मंगेश जोशी, जळगाव:
Todays Gold Silver Rate: राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह सुरु आहे. दिवाळीमध्ये खास मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु असते. धनत्रयोदशीचा (Dhanteras) सण जसजसा जवळ येत आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं (Gold) आणि चांदी (Silver) खरेदीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
धनत्रयोदशीला सोन्याचा तोरा संप
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Price Hike) सतत होणाऱ्या वाढीमुळे अनेक ग्राहकांनी खरेदी थांबवली होती. सोने १ लाख ३५ हजार रुपये प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण होते. अशातच धनत्रयोदशीच्या दिवशीच एक मोठी गूड न्यूज समोर आली आहे.
Diwali Sweets : दिवाळीसाठी देशातील सर्वात महाग मिठाई, त्या किमतीत iPhone येईल, आकडा हैराण करणारा!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात पुन्हा खरेदीसाठी नवचैतन्य (Revival) निर्माण झाले आहे. आज सकाळी सोन्याचे दर १ लाख ३५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले असताना, त्यात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात थेट ३ हजार रुपयांची घसरण झाली असून, सोन्याचा भाव १ लाख ३२ हजार रुपयांवर (GST सह) आला आहे.
आजचे सोने- चांदीचे दर
सुवर्णनगरी जळगावमध्ये जीएसटीविना (GST excluded) १ लाख २८ हजार ४०० रुपये प्रति तोळा आहे तर जीएसटीसह १ लाख ३२ हजार रुपये प्रति तोळा आहे. आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचे भाव आता १ लाख ७५ हजार रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. जीएसटीविना (GST excluded): १ लाख ७० हजार रुपये प्रति किलो आहे तर जीएसटीसह (GST included): १ लाख ७५ हजार रुपये प्रति किलो आहे.
New Car inspection: दिवाळीत नवी कार घेताय? 'या' 6 गोष्टी शोरुममध्येच तपासून घ्या
दरम्यान, दर कमी झाल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि लहान गुंतवणूकदारांना सोने खरेदीची संधी मिळाली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बाजारात आता मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पारंपरिक आणि मौसमी मागणीव्यतिरिक्त, गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँका सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत, ज्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world