
Dhanteras 2025 Good Luck Tips: दिवाळी सणास शुभारंभ झाला आहे. दिव्यांच्या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी दिवशी सोने-चांदीसह अन्य गोष्टीही खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी एखादी गोष्ट खरेदी केली की ती 13 पट वाढते, असे म्हणतात. पण प्रत्येकाला सोनेचांदीसारख्या मौल्यवान गोष्टी खरेदी करणे शक्य होईलच असे नव्हे. त्यामुळे याव्यतिरिक्त तुम्ही 10 अशा गोष्टीही खरेदी करू शकता, ज्यामुळे लक्ष्मीमातेचा मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
1. केरसुणी (झाडू)
हिंदू धर्मामध्ये केरसुणीला लक्ष्मीमातेचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करून पूजा करणे शुभ मानले जाते, याद्वारे लक्ष्मीमातेची आपल्यावर कृपा कायम राहते. धनत्रयोदशी दिवशी तीन झाडू खरेदी करुन घरामध्ये पूजा करावी. यापैकी एक झाडू मंदिरामध्ये अर्पित करावा.
2. धणे
धनत्रयोदशी दिवशी धणे खरेदी करणंही शुभ मानले जाते. दिवाळीच्या रात्री प्रदोष काळादरम्यान श्री गणेश - लक्ष्मीमातेच्या पूजेदरम्यान धणे अर्पण केल्यास धनाची देवी प्रसन्न होते, असे म्हणतात. धणे खरेदी केल्यास संपत्तीमध्ये वाढ होते, अशी मान्यता आहे.
3. शंख
हिंदू परंपरेनुसार शंख अतिशय पवित्र वस्तू मानली जाते. ज्यामध्ये घरामध्ये शंख असते आणि जेथे त्याची पूजा केली जाते, तेथे भय आणि गरिबी अशा नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. शंख आणि लक्ष्मीमाता समुद्र मंथनाद्वारे प्रकट झाले होते, त्यामुळे लक्ष्मीमाता शंखाला तिचा भाऊ मानते. तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर धनत्रयोदशी दिवशी ही वस्तू नक्की खरेदी करा.
4. गोमती चक्र
शंखाप्रमाणेच दिवाळीच्या पूजेमध्ये गोमती चक्राचाही समावेश करणं अतिशय शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचे हे प्रतीक असल्याचे म्हणतात. धनत्रयोदशी दिवशी घरामध्ये गोमती चक्र आणल्यास लक्ष्मीमातेकडून सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळतो.
5. कवड्या
मान्यतेनुसार धनाची देवी लक्ष्मीमातेला कवड्या खूप प्रिय आहेत. देवीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करा. पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या नाहीत तर विकत आणलेल्या कवड्यांना हळद किंवा केशर अर्पण करा आणि पूजेदरम्यान या कवड्या लक्ष्मीमातेला अर्पण करा.

6. लक्ष्मीदेवी-गणपती देवतेची मूर्ती
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पूजा करण्यासाठी लक्ष्मीमाता आणि गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्याची परंपरा आहे. गणपती बाप्पा आणि लक्ष्मीमातेची आसनस्थ मूर्ती घरी आणा. मूर्तीमध्ये लक्ष्मीमातेचे वाहन घुबड आणि गणपती बाप्पाचे उंदीर वाहन असावे.
7. हळकुंड
प्रत्येक पूजेमध्ये हळकुंडाचा समावेश केला जातो. धनत्रयोदशी दिवशी हळकुंड खरेदी करुन घरी आणल्यास घरात धनधान्य वाढते आणि शुभ फळ मिळते असे म्हणतात.
8. बताशालक्ष्मीमातेच्या पूजेसाठी बताशाचा समावेश करणे अतिशय शुभ मानले जाते. बताशा खरेदी करुन घरी आणल्यास आणि लक्ष्मीदेवीला अर्पण केल्यास धनाची देवी प्रसन्न होते तसेच तुमच्या जीवनातील अडचणी दूर करते, असे म्हणतात.
(नक्की वाचा: Happy Dhanteras 2025 Wishes: तुमचे भाग्य उजळो, महालक्ष्मी मातेची कृपा होवो; धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा)
9. सुपारीहिंदू धर्मामध्ये गणपतीचे प्रतीक मानून सुपारीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सुपारी खरेदी करण्याचे विशेष फायदे आहेत. दिवाळीच्या पूजेमध्ये सुपारीचा समावेश करावा आणि प्रसाद म्हणून सुपारी तिजोरीमध्ये ठेवावी.
10. भांडे
धनत्रयोदशी दिवशी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते, असे म्हणतात. मान्यतेनुसार या दिवसापासून अमृत पात्र किंवा जल पात्र खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली आणि या दिवशी भांडे खरेदी करणे शुभ मानले जाते. लोखंड, स्टील किंवा अॅल्युमिनिअमची भांडी खरेदी करणं टाळा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world