जाहिरात

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त, स्त्रोत्र आणि यमदीपदानाची माहिती जाणून घ्या

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी, कोणत्या मुहूर्तावर करावी, यमदीपदानाचे काय महत्त्व आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त, स्त्रोत्र आणि यमदीपदानाची माहिती जाणून घ्या
"Dhanteras 2025: धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी?"
Canva

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला महालक्ष्मी माता, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला 'धनत्रयोदशी' साजरी केली जाते. धनत्रयोदशी (Dhanteras 2025) म्हणजेच देवतांचे वैद्य 'धन्वंतरी देवता' यांची जयंती (Dhanvantari Puja). यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? कोणत्या स्त्रोत्राचे पठण करावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

धनत्रयोदशी 2025 पूजा कशी करावी? | Dhanteras 2025 Puja Rituals 

  • ब्रह्म मुहूर्तापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. 
  • धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी माता आणि धन्वंतरी देवतेचीही पूजा करण्याचे महत्त्व आहे. 
  • चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यावर स्वस्तिक काढा. 
  • चौरंगावर लक्ष्मीमाता, भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. 
  • तांदळावर दिवा ठेवून प्रज्वलित करावा. 
  • चौरंगावरील देवांना जल, हळद-कुंकू, फुले, फळं आणि मिठाई अर्पण करा. मंत्राचा जप करावा. 
  • आरती-प्रार्थना करुन प्रसादाचे वाटप करा. 

धनत्रयोदशी तिथी | Dhanteras 2025 | Trayodashi Tithi Begins And Tithi Ends Time

धनत्रयोदशीच्या तिथीस 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.18  वाजता प्रारंभ होणार असून 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.51 वाजता तिथी समाप्त होणार आहे. 

प्रदोष काळ (Pradosh Kaal) 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.13 वाजेपासून ते रात्री 8.41 वाजेपर्यंत आहे.

धनत्रयोदशीच्या पूजेची मांडणी कशी करावी? पाहा VIRAL VIDEO 

धनलक्ष्मीस्तोत्रम् पठणाचे महत्त्व 

वास्तुशास्त्रज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी (शनिवारी) धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर (संध्याकाळी 5.57 वाजेनंतर ) घरातील रोखरक्कम, कोणतेही मुठभर धान्य, नोटा, सोने-चांदी यांचे यथाशक्ती पूजनअर्चन करावे. श्री लक्ष्मीदेवींचे पूजन करून धणे-गूळ एकत्रित करून नैवेद्य अर्पण करावा आणि घरातील मंडळींनाही हा प्रसाद द्यावा. तसेच खालील स्तोत्राचे 11 वेळा पठण करावे. उच्चार कठीण वाटल्यास सावकाश वाचन केले तरी चालेल पण अक्षरं वगळू नका.  

॥ धनलक्ष्मीस्तोत्रम् ॥
धनदा उवाच
देवी देवमुपागम्य नीलकण्ठं मम प्रियम् ।
कृपया पार्वती प्राह शंकरं करुणाकरम् ॥
देव्युवाच
ब्रूहि वल्लभ साधूनां दरिद्राणां कुटुम्बिनाम् ।
दरिद्र दलनोपायमंजसैव धनप्रदम् ॥
शिव उवाच
पूजयन् पार्वतीवाक्यमिदमाह महेश्वरः ।
उचितं जगदम्बासि तव भूतानुकम्पया ॥
स सीतं सानुजं रामं सांजनेयं सहानुगम् ।
प्रणम्य परमानन्दं वक्ष्येऽहं स्तोत्रमुत्तमम् ॥
धनदं श्रद्धानानां सद्यः सुलभकारकम् ।
योगक्षेमकरं सत्यं सत्यमेव वचो मम ॥
पठंतः पाठयंतोऽपि ब्रह्मणैरास्तिकोत्तमैः ।
धनलाभो भवेदाशु नाशमेति दरिद्रता ॥
भूभवांशभवां भूत्यै भक्तिकल्पलतां शुभाम् ।
प्रार्थयत्तां यथाकामं कामधेनुस्वरूपिणीम् ॥
धनदे धनदे देवि दानशीले दयाकरे ।
त्वं प्रसीद महेशानि! यदर्थं प्रार्थयाम्यहम् ॥
धराऽमरप्रिये पुण्ये धन्ये धनदपूजिते ।
सुधनं र्धामिके देहि यजमानाय सत्वरम् ॥
रम्ये रुद्रप्रिये रूपे रामरूपे रतिप्रिये ।
शिखीसखमनोमूर्त्ते प्रसीद प्रणते मयि ॥
आरक्त-चरणाम्भोजे सिद्धि-सर्वार्थदायिके ।
दिव्याम्बरधरे दिव्ये दिव्यमाल्यानुशोभिते ॥
समस्तगुणसम्पन्ने सर्वलक्षणलक्षिते ।
शरच्चन्द्रमुखे नीले नील नीरज लोचने ॥
चंचरीक चमू चारु श्रीहार कुटिलालके ।
मत्ते भगवती मातः कलकण्ठरवामृते ॥
हासाऽवलोकनैर्दिव्यैर्भक्तचिन्तापहारिके ।
रूप लावण्य तारूण्य कारूण्य गुणभाजने ॥
क्वणत्कंकणमंजीरे लसल्लीलाकराम्बुजे ।
रुद्रप्रकाशिते तत्त्वे धर्माधरे धरालये ॥
प्रयच्छ यजमानाय धनं धर्मेकसाधनम् ।
मातस्त्वं मेऽविलम्बेन दिशस्व जगदम्बिके ॥
कृपया करुरागारे प्रार्थितं कुरु मे शुभे ।
वसुधे वसुधारूपे वसु वासव वन्दिते ॥
धनदे यजमानाय वरदे वरदा भव ।
ब्रह्मण्यैर्ब्राह्मणैः पूज्ये पार्वतीशिवशंकरे ॥
स्तोत्रं दरिद्रताव्याधिशमनं सुधनप्रदम् ।
श्रीकरे शंकरे श्रीदे प्रसीद मयिकिंकरे ॥
पार्वतीशप्रसादेन सुरेश किंकरेरितम् ।
श्रद्धया ये पठिष्यन्ति पाठयिष्यन्ति भक्तितः ॥
सहस्रमयुतं लक्षं धनलाभो भवेद् ध्रुवम् ।
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भवन्तु त्वत्प्रसादान्मे धन-धान्यादिसम्पदः ॥
॥ इति श्री धनलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम् || 

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार गुंतवणूक करा, भाग्य उजळेल आणि पैशांचा होईल वर्षाव

(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार गुंतवणूक करा, भाग्य उजळेल आणि पैशांचा होईल वर्षाव)

धनत्रयोदशीला 11 ठिपक्यांची रांगोळी का काढावी? | Dhanteras 2025 Rangoli Design 

वाढदिवसाच्या तारखेनुसार धनत्रयोदशीला कोणता उपाय करावा? 

तुमच्या वाढदिवसाची तारीख यापैकी  2, 3, 6 ,8,9,10,11,12,16,17,18 21,25,23,27,28,29,31 आहे का? तर ज्योतिषी कौस्तुभ जोशी यांनी सांगितलेला उपाय जाणून घ्या...

धनत्रयोदशीला यमदीपदान करताना 13 दिवे का अर्पण करावे? | Dhanteras 2025 Yamadeepdaan Significance

मान्यतेनुसार धनत्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेस 13 दिवे प्रज्वलित केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते, असे म्हणतात. 13 दिव्यांपैकी पहिला दिवा घरच्या प्रवेशद्वाराबाहेर ठेवावा, दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवावे. दुसरा दिवा धनाची देवता लक्ष्मीमातेसमोर ठेवावा. एक दिवा तुळशीच्या रोपासमोर ठेवावा. एक दिवा घराच्या मधोमध ठेवावा उर्वरित दिवे घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये ठेवावे.  

धनत्रयोदशी 2025 स्पेशल रांगोळी डिझाइन | Dhanteras 2025 Rangoli Designs  

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Dhanteras 2025 

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या

(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com