जाहिरात

10 Rules For Diabetes Management: डायबेटीस नियंत्रणात येत नाहीये? 10 सोपे नियम पाळा आणि चमत्कार पाहा

10 Rules For Diabetes Management: या नियमांचे पालन केल्यास मधुमेह हमखास नियंत्रणात येण्यास मदत होते. 

10 Rules For Diabetes Management: डायबेटीस नियंत्रणात येत नाहीये? 10 सोपे नियम पाळा आणि चमत्कार पाहा
मुंबई:

10 Rules For Diabetes Management:  मधुमेह (Diabetes) हा आजकाल एक सामान्य आजार बनला आहे. एकदा का याचे निदान झाले की, रुग्णाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ग्ल्यायसेमिक इंडेक्स (Glycemic Index), विविध प्रकारचे आहार आणि औषधे याविषयी अनेक चर्चा सुरू होतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी किंवा तो उलटवण्यासाठी (reversal) किचकट गोष्टींपेक्षा काही मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी यांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 सोप्या आणि महत्त्वाच्या नियमांची माहिती दिली आहे. या नियमांचे पालन केल्यास मधुमेह हमखास नियंत्रणात येण्यास मदत होते. 

10 सुवर्ण नियम

  1. जेवण चुकवू नका: अनेकदा लोक मधुमेह नियंत्रणासाठी जेवण स्किप करतात. पण असे केल्याने पुढील जेवणात जास्त खाल्ले जाते आणि त्यामुळे शुगरची पातळी अचानक वाढते.
  2. साखर पूर्णपणे बंद करा: 'थोडीशीच साखर घेतो' ही सवय आरोग्यासाठी हळूहळू घातक ठरू शकते. त्यामुळे साखरेचा वापर पूर्णपणे बंद करा.
  3. पोळीऐवजी भाकरीला प्राधान्य: पोळीऐवजी अर्धी पोळी आणि भरपूर पालेभाज्या किंवा भाकरी खा. भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यात फायबर जास्त असते आणि पचनासाठीही ती चांगली असते.
  4. एका वेळेस एकच धान्य: भात (Rice) आणि पोळी (Roti) दोन्ही एकत्र खाणे टाळा. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते.
  5. पुरेशी प्रथिने (Protein) : दररोज पुरेशी प्रथिने घेतल्याने स्नायू मजबूत राहतात, चयापचय (metabolism) क्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात राहते.
  6. जेवणानंतर 15 मिनिटे चाला: प्रत्येक जेवणानंतर 15 मिनिटे चालण्याने नैसर्गिकरित्या इन्सुलिन वाढवण्यास मदत होते, त्यामुळे जेवणानंतर लगेच बसू नका.
  7. पुरेशी आणि शांत झोप: अपुऱ्या झोपेमुळे कॉर्टिसोल (Cortisol) आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. चांगली झोप घेणे हा साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीचा एक प्रभावी उपचार आहे.
  8. खाण्याची पद्धत बदला: आपल्या जेवणाच्या ताटात कर्बोदके (Carbs) कमी, तर प्रथिने, फायबर आणि निरोगी फॅट्सचे प्रमाण जास्त ठेवा. यामुळे इन्सुलिनवरील ताण कमी होतो.
  9. फळे ‘स्नॅक' म्हणून खाऊ नका: फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, मात्र ती साखरच असते. त्यामुळे फळे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.
  10. तणावावर (Stress) नियंत्रण ठेवा: मानसिक तणावामुळे इन्सुलिनची प्रतिकारशक्ती (Insulin resistance) वाढते. योग, ध्यान आणि सामाजिक आधारामुळे तणाव कमी करण्यास मदत होते.

या सोप्या नियमांसोबतच, दर महिन्याला रक्तातील साखरेची तपासणी करा आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहा. या मूलभूत गोष्टींचे पालन केल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवणे नक्कीच शक्य आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याचा अनेकांना फायदा होईल.
 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com