जाहिरात

अजिबात घाबरू नका! Diabetes नियंत्रणात राहणार, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' रामबाण उपाय एकदा नक्की वाचा

Diabetes Control Tips : संसार-प्रपंचाचा गाडा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सर्वांचीच धावपळ होते. नोकरी असो किंवा व्यवसाय प्रत्येकाला प्रचंड मेहनत घेऊन पोटाची खळगी भरावी लागतात.

अजिबात घाबरू नका! Diabetes नियंत्रणात राहणार, डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' रामबाण उपाय एकदा नक्की वाचा
Diabetes Control Tips
मुंबई:

Diabetes Control Tips : संसार-प्रपंचाचा गाडा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सर्वांचीच धावपळ होते. नोकरी असो किंवा व्यवसाय प्रत्येकाला प्रचंड मेहनत घेऊन पोटाची खळगी भरावी लागतात. परंतु, काही लोक चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजारांच्या विळख्यात सापडतात. अशीच एक आरोग्याची भयंकर समस्या म्हणजे मधुमेह. दैनंदिन आहारात होणारे बदल आणि अयोग्य जीवनशैलीमुळे काही लोकांना मधुमेहासारख्या समस्येला तोंड द्यावं लागतं. परंतु, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी दिलेले सल्ले रामबाण उपाय ठरू शकतात. मधुमेहावर नियंत्रण कसं मिळवावं? याबाबत डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलचे इंटेन्सिव्हिस्ट आणि जनरल फिजिशियन डॉ. कुशल बांगर यांनी महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. 

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेहासारखा आजार झपाट्याने वाढत आहे.संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा असा हा दीर्घकालीन विकार आहे. त्यामुळे मधुमेहावर योग्य वेळी निदान करून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.मधुमेह नियंत्रित न ठेवल्यास हृदयविकार,मूत्रपिंड निकामी होणे,अंधत्व,रक्तवाहिन्यांवर परिणाम आणि पायाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. नियमित आहार,व्यायाम,औषधे व जीवनशैलीत बदल करून मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगता येते.

1) सकस आहाराचे सेवन करा

•    साखर आणि गोड पदार्थांचे सेवन टाळा : मिठाई, पेस्ट्री, शीतपेये, गोड पेये हे रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात.
•    संपूर्ण धान्यांचा वापर करा : ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राउन राईस यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते.
•    भाजीपाला आणि फळे : काकडी, कारली, दोडका, मेथी, पालक, गवार, दुधी, अशा भाज्या जास्त प्रमाणात खा.
•    पेरू,सफरचंद,संत्री,पपई,ड्रॅगनफ्रूटचं सेवन करू शकता.
•    आंबा,द्राक्षे,केळी,सीताफळ यांसारखी गोड फळे प्रमाणात खाणे आवश्यक आहे.
•    प्रथिने (Proteins) : कडधान्ये, मूग, हरभरा, डाळी, सोयाबीन, डाळींबी, अंडी, मासे यांचा आहारात समावेश करा.
•    पाणी भरपूर प्या : शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि भूक नियंत्रित राहते.

नक्की वाचा >> वैभव सूर्यवंशी पुन्हा चमकला! यूथ ODI मध्येही केला धमाका,'हा' वर्ल्ड रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

2)  नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे

    •    दररोज किमान 30-45 मिनिटे चालावे किंवा स्लो जॉग करणेही फायदेशीर ठरू शकते.
    •    योगा, प्राणायाम,सूर्यनमस्कार केल्याने तणाव कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.
    •    जर दिवसभर बसून काम असेल, तर प्रतितास किमान 5 मिनिटे उठून चालणे गरजेचे आहे.
    •    आठवड्यातून 2 दिवस हलके वजन उचलण्याचे व्यायाम (strength training) करणेही उपयुक्त.

3) वजन नियंत्रित ठेवणे

•    कंबरेवर असलेली चरबी मधुमेहाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
 •   लठ्ठपणामुळे इन्सुलिन सुरळीतपणे काम करत नाही.
 •    वजन कमी केल्यास रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि बीपी सुद्धा कमी होतो.
 •    बीएमआय (BMI) 18.5 ते 24.9 दरम्यान ठेवणे.

4)  तणावाचे व्यवस्थापन

 •    तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन वाढते,ज्यामुळे रक्तातील साखर वाढते.
 •    ध्यान,श्वसनक्रिया ,संगीत ऐकणे,वाचन,छंद जोपासणे यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.
 •    पुरेशी झोप (रोज 7–8 तास) घेणे अत्यंत महत्त्वाचे.

5) नियमित वैद्यकीय तपासणी

रक्तातील साखर तपासणी वेळोवेळी करावी.  यामध्ये उपाशीपोटी (Fasting blood sugar), जेवणानंतर (PP – Post Prandial) रक्तातील साखरेची पातळी तपासणे.
    •    HbA1c (३ महिन्यांचा सरासरी साखरेचा अहवाल)
    •    डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे (टॅबलेट्स किंवा इन्सुलिन) वेळेवर घ्यावी.
    •    रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मूत्रपिंड, डोळे, पाय यांची वर्षातून एकदा तपासणी करणे गरजेचे आहे.

खालील टीप्सचे नक्की पालन करा

•    मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा.
•    बाहेरील जंक फूड,तळलेले पदार्थ कमी करा.
•    वेळेवर जेवण करा,खुप वेळ उपाशी राहू नका.
•    थोड्या थोड्या अंतराने खाणे. यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते.

मधुमेह हा पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरी योग्य जीवनशैली आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीने तो प्रभावीपणे नियंत्रित करता येतो. योग्य नियंत्रण ठेवल्यास केवळ गुंतागुंत टाळता येत नाही, तर दीर्घकाळ निरोगी,सक्रिय आणि दर्जेदार जीवन जगणे शक्य होते.

Disclaimer : आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेली आहे. एनडीटीव्ही या माहितीची पुष्टी करत नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com