दिलजीत दोसांझ 10 वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त; सर्जरी का टाळली? बड्या डॉक्टरांनी दिला थेट धोक्याचा इशारा

Diljit Dosanjh Health Update: प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझने गेल्या 10 वर्षांपासून एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याे सांगितले. जाणून घ्या या समस्येची लक्षणे, कारणे आणि दुर्लक्ष केल्यास होणारे गंभीर परिणाम.

जाहिरात
Read Time: 5 mins
"Diljit Dosanjh Gallbladder Stone: दिलजीत दोसांझने स्वतःच्या आरोग्याबाबत केला मोठा खुलासा"
NDTV

पंजाबी सिनेमापासून ते बॉलिवूड आणि त्यानंतर ग्लोबल म्युझिक स्टेजवर राज्य करणाऱ्या दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अभिनेत्याने स्वतःच्या आरोग्याबाबत मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून त्याचे चाहते थक्क झाले आहेत. दिलजीत मागील 10 वर्षांपासून एका गंभीर आजाराचा सामना करत आहे, पण त्याने आजपर्यंत शस्त्रक्रिया केलेली नाही. मजेशीर गोष्ट म्हणजे या गोष्टीची पुसटशी कल्पना देखील त्याने आपल्या घरच्यांना येऊ दिली नाही.

मित्राच्या एका सल्ल्यामुळे शस्त्रक्रिया टाळली

'चमकिला' फेम अभिनेत्याने एका मुलाखतीत खुलासा केला की, वर्ष 2015 मध्ये मेडिकल चेकअप दरम्यान मूतखड्याची समस्या समोर आली. 11-12 MM आकाराचे खडे असल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले आणि ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. पण त्याच्या एका मित्राने त्याला एक विचित्र सल्ला दिला.

"जेव्हा खड्यांमुळे तुला कोणताही त्रास होत नाहीये, तर मग पोटामध्ये सुरी कशाला चालवून घेतोस?"

 दिलजीतच्या म्हणण्यानुसार त्याच्या मित्राने सल्ला दिला की,"जेव्हा खड्यांमुळे तुला कोणताही त्रास होत नाहीये, तर मग पोटामध्ये सुरी कशाला चालवून घेतोस?" बस , मित्राची ही गोष्ट दिलजीतच्या मनात घर करून बसली आणि त्याने ऑपरेशनचा प्लॅन कायमचा पुढे ढकलला कारण त्याला कधीही कोणताही त्रास किंवा वेदना जाणवल्या नाहीत.

या विषयावर डॉक्टर एस. के. सरीन यांनी एनडीटीव्हीशी (NDTV) बातचित करताना सांगितले की, पित्ताशयातील खड्यांकडे इतक्या प्रदीर्घ काळासाठी दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. अनेकदा लोकांना वाटते की वेदना होत नाहीत म्हणजे सर्व काही ठीक आहे, पण आतल्या आत हे गंभीर इन्फेक्शन (संसर्ग) किंवा पॅनक्रियाटायटिस यासारख्या जीवघेण्या समस्यांचे रूप घेऊ शकते.

Advertisement

(नक्की वाचा : Belly Fat Loss Tips: 'मी फक्त 2 पोळ्या खातो, तरीही ढेरी का सुटतेय?' सपाट पोट हवंय पण नेमकं काय चुकतंय? वाचा)

गॉलब्लॅडर स्टोन अनेकदा वर्षानुवर्षे कोणतीही लक्षणे दाखवत नाही.
तपासणीशिवाय खड्यांची समस्या संपलीय असे मानणे धोकादायक ठरू शकते.
गंभीर प्रकरणांमध्ये इन्फेक्शन, पॅनक्रियाटायटिस यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार पुढे ढकलणे योग्य नाही.

पित्ताशयातील खड्यांची समस्या स्वतःहून कमी होऊ शकते का?

मुलाखतीदरम्यान दिलजीतने आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगितली. त्याला असे वाटते की कदाचित इतक्या वर्षांत हे खडे आता स्वतःहूनच नाहीसे झाले असतील. पण कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे तो जिथे कुठे जातो तिथे आपल्यासोबत औषधांचा एक बॉक्स नक्कीच ठेवतो. ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मूतखड्यामुळे वेदना होत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे का? यावर डॉक्टर सरीन यांनी सांगितलं की-

लोकांमध्ये हा एक खूप मोठा गैरसमज आहे की औषधांमुळे पित्ताशयातील खड्यांची समस्या पूर्णपणे बरी होती तर मेडिकल सायन्समध्ये बहुतांश प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियाच एकमेव उपाय असतो. तपासणीशिवाय केवळ अंदाजाने हे गृहित धरणे की खडे शरीराबाहेर बाहेर फेकले जात असतील तर कोणत्याही रुग्णासाठी अतिशय जोखमीचे ठरू शकते.

Dr SK Sarin

मूतखड्याची लक्षणं, कारणं आणि उपाय

दिलजीत दोसांझने स्वतःच्या आरोग्याबाबत माहिती सांगितल्यानंतर प्रत्येक जण हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की पित्ताशयात खडे का होतात? या समस्येपासून कसा बचाव करता येईल, चला तर तज्ज्ञांकडून सोप्या भाषेत जाणून घेऊया माहिती... 

Advertisement

1. पित्ताशयात खडे होण्याची लक्षणे (Symptoms)

बहुतांश प्रकरणांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे तोपर्यंत दिसून येत नाहीत जोपर्यंत ते पित्तनलिकेत अडथळा निर्माण करत नाहीत. जर ही समस्या वाढली तर शरीरात ही लक्षणे दिसू शकतात:

  • पोटाच्या वरच्या उजव्या भागात अचानक आणि तीव्र वेदना होणे.
  • पाठीमध्ये दोन्ही खांद्यांच्या मधोमध किंवा उजव्या खांद्यामध्ये वेदना पसरणे.
  • जड किंवा तळलेले-भाजलेले अन्न खाल्ल्यानंतर पोटात तीव्र वेदना आणि अस्वस्थता येणे.
  • मळमळणे, उलट्या होणे किंवा वारंवार गॅस आणि अपचनाची तक्रार असणे.
  • गंभीर प्रकरणांमध्ये त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ किंवा जॉन्डिस) आणि तीव्र ताप येणे.

कोणत्या लोकांना मूतखड्याचा धोका जास्त असतो?

  • लठ्ठपणा
  • हाय कोलेस्ट्रॉल
  • फॅटी डाएट (चरबीयुक्त आहार)
  • वेगाने वजन घटवणे
  • आहारात कमी फायबरचा समावेश करणे

2. मूतखडे होण्यामागील मुख्य कारणे (Causes)

पित्ताशयात खडे तयार होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यातील प्रमुख खालीलप्रमाणे आहेत:
पित्तात (Bile) कोलेस्ट्रॉलचे अतिप्रमाण: जेव्हा लिव्हर खूप जास्त कोलेस्ट्रॉल तयार करू लागते आणि पित्त ते विरघळवू शकत नाही, तेव्हा ते हळूहळू खड्यांचे रूप घेते.
लठ्ठपणा आणि खराब लाइफस्टाइल: वजन जास्त असण्यामुळे किंवा अचानक खूप जास्त वजन घटवण्यामुळे देखील पित्ताशयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे खड्यांचा धोका वाढतो.
कमी पाणी पिणे आणि आहार: जेवणात फायबरची कमतरता असणे आणि खूप जास्त फॅटी किंवा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने पचन बिघडते, जे खड्यांचे कारण बनते.
पित्ताशय पूर्णपणे रिकामे न होणे: जर पित्ताशय वेळेवर किंवा पूर्णपणे रिकामे झाले नाही तर पित्त घट्ट होऊ लागते आणि खड्यांचे रूप घेते.

Advertisement

(नक्की वाचा: Depression Symptoms: सतत लोकांचे फोन टाळताय? एकटेच राहताय? धोक्याची घंटा ओळखा, नाहीतर होईल मोठं नुकसान)

3. पित्ताशयाच्या खड्यांपासून बचावाचे उपाय (Prevention Tips)

  • आहारात फायबर वाढवा: आपल्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, तृणधान्ये आणि डाळींचा समावेश करा. फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते.
  • हेल्दी फॅट्स निवडा: रिफाइंड ऑइल आणि डालडाऐवजी ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) किंवा मर्यादित प्रमाणात शुद्ध तुपाचा वापर करावा. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असलेल्या गोष्टी पित्ताशयासाठी चांगल्या असतात.
  • वजन नियंत्रणात ठेवा: नियमित व्यायाम किंवा वॉक करा. लक्षात ठेवा की वजन हळूहळू आणि हेल्दी पद्धतीने कमी करा, क्रॅश डाएटिंग (उपाशी राहून वजन कमी करणे) टाळा.
  • भरपूर पाणी प्या: दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या जेणेकरून शरीरातील टॉक्सिन्स (विषारी घटक) बाहेर पडू शकतील आणि पित्त घट्ट होणार नाही.
  • वेळेवर जेवा: नाश्ता किंवा दुपारचे जेवण न केल्यास पित्ताशयात पित्त साठून राहते. म्हणूनच रोज एका निश्चित वेळेवर जेवण्याची सवय लावा.

डॉक्टर एस. के. सरीन यांनी हे देखील समजावून सांगितले की, जे लोक दिलजीतची कहाणी ऐकून आपल्या मूतखड्यांच्या समस्येवर उपचार करत नाहीत, त्यांनी सावध व्हावे. तुमच्या पित्ताशयातही खडे झाले असतील आणि लक्षणे दिसत नसतील तरीही तुम्ही नियमित सोनोग्राफी करून घेतली पाहिजे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिले पाहिजे, जेणेकरून वेळेत योग्य पाऊल उचलले जाऊ शकेल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)