लक्ष्मीमातेचा घरात होईल प्रवेश, दिवाळीत दारी काढा सुंदर रांगोळी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व 

Rangoli Design Significance: रांगोळी हे सुख-समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये रांगोळी का काढली जाते?  

जाहिरात
Read Time: 2 mins

Rangoli Design Significance: रांगोळी ही एक पारंपरिक भारतीय कला आहे, विविध कार्यक्रमांमध्ये तसेच शुभप्रसंगांच्या निमित्ताने रांगोळी काढली जाते. विविध रंग, फुले, धान्य इत्यादी गोष्टींचा वापर करून सुंदर-सुंदर रांगोळी साकारली जाते. बदलत्या जीवनशैलीनुसार रांगोळींच्या डिझाइनमध्येही वैविध्य पाहायला मिळते. दुसरीकडे रांगोळीचे धार्मिक महत्त्वही आहे. यासाठी दिवाळीसारख्या सणांमध्ये प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी चांगले भाग्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे.   

रांगोळीच्या माध्यमातून लोक देवी-देवतांप्रति त्यांच्या मनातील आदर, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वार आणि देवघरामध्ये रांगोळी साकारली जाते. यामुळे घरामध्ये लक्ष्मीमातेचे आगमन होते, असे म्हणतात. 

(नक्की वाचा: दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीमाता-गणपती बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य)

रांगोळी का काढली जाते? याचे महत्त्व जाणून घेऊया

दिवाळी सणाच्या वेळेस लक्ष्मीमाता, धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते. यावेळेस घरासमोर रांगोळीही काढली जाते. घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा, यासाठी रांगोळी काढणे हे शुभ असते. 

सकारात्मकतेचे प्रतीक

रांगोळी सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. रांगोळीकरिता वापरले जाणारे विविध रंग जीवनामध्ये आनंद घेऊन असतात, असेही म्हणतात. यामुळे घरातील नकारात्मकताही दूर होते. तसेच आजही कित्येक घरांतील सदस्य तसेच कार्यक्रमानिमित्त मित्रपरिवारही एकत्रित रांगोळी काढतात. ज्याद्वारे एकतेची शिकवण मिळते. 

Advertisement

(नक्की वाचा: Diwali Decoration Ideas: केळीच्या पानापासून घरच्या घरी झटपट तयार करा तोरण)

कौशल्याचे प्रतीक

रांगोळी हे एक कलाकौशल्याचेही प्रतीक आहे. विविध रंग आणि डिझाइनचा उपयोग करून लोक त्यांचे कौशल्य सादर करतात.  तसेच रांगोळी हे केवळ सजावटीचे नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि धार्मिक विश्वासाचेही प्रतीक मानले जाते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)