जाहिरात

Diwali Decoration Ideas: केळीच्या पानापासून घरच्या घरी झटपट तयार करा तोरण

Diwali Decoration Ideas: सण-उत्सवाकरिता घराची सजावट करण्यासाठी बाजारामध्ये जाऊन खर्च करण्याऐवजी घरच्या घरीच झटपट तोरण तयार करू शकता. 

Diwali Decoration Ideas: केळीच्या पानापासून घरच्या घरी झटपट तयार करा तोरण

Diwali 2024 Decoration Ideas: सण-उत्सवाच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सण-समारंभामुळे घराची स्वच्छता आणि सजावट करण्यामध्ये सर्वजण व्यस्त आहेत. सणांदरम्यान घरामध्ये पाहुण्यांचीही ये-जा सुरू असते. पण सजावट म्हटले की खर्चामुळे खिसा देखील रिकामा होतो. नवीन कपडे, मिठाई, घरातील आवश्यक वस्तू आणि सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. खर्च कमी करण्यासाठी तुम्ही देखील उपाय शोधत आहात का? तर बाजारातील वस्तू विकत आणण्याऐवजी घरामध्येच सजावटीच्या वस्तू तयार करू शकता. घरच्या घरी केळीच्या पानापासून तोरण कसे तयार करायचे? याची ट्रिक डिजिटल क्रिएटर साक्षी टमटाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. इको फ्रेंडली डेकोरेशनमुळे पर्यावरणासही हानी पोहोचणार नाही. चला तर जाणून घेऊया तोरण तयार करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती... 

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

केळीच्या पानापासून कसे तयार करायचे तोरण? Making Toran With Banana Leaf 

- तोरण तयार करण्यासाठी सर्वप्रथम केळीचे मोठे पान घ्या.  
- एक हाताचे अंतर सोडून पान कापा. 
- व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानावर त्रिकोण आकाराचे डिझाइन तयार करा. 
- पानाच्या वरील बाजूस झेंडुचे फुल लावा. 
- त्रिकोण आकाराच्या डिझाइनच्या कडेवर गोंद लावा आणि गुलाबाच्या पाकळ्या चिकटवा.  
- त्रिकोण आकाराच्या डिझाइनच्या टोकावर पांढऱ्या रंगाचे फुलही लावा.  
- तयार झाले आहे केळीच्या पानाचे इको फ्रेंडली तोरण  (Banana Leaf Toran). 
- तोरण दरवाज्यावर बांधण्यासाठी दोन्ही बाजूने धागा बांधावा आणि दारावर लावावे.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलांचा वापर करू शकता.  

 (नक्की वाचा:  प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

Video Credit @ Sakshi Tamta Instagram 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 
Diwali Decoration Ideas: केळीच्या पानापासून घरच्या घरी झटपट तयार करा तोरण
Okra water benefits, know more about bhindi water
Next Article
काय सांगता काय! 'या' भाजीचं पाणी प्यायल्याने वजन सटासट कमी होतं ?