जाहिरात

Diwali Photo Editing: दिवाळीचे फोटो एडिट करण्यासाठी Google च्या 'Nano Banana' AI ची जादू! वाचा सर्व माहिती

Diwali Photo Editing:  दिवाळीच्या (Diwali) झगमगाटात प्रत्येक क्षणाची आठवण खास असावी, अशी तुमची इच्छा आहे का? तर, आता तुम्हाला प्रोफेशनल फोटोशूट किंवा क्लिष्ट एडिटिंग सॉफ्टवेअरची गरज नाही.

Diwali Photo Editing: दिवाळीचे फोटो एडिट करण्यासाठी Google च्या 'Nano Banana' AI ची जादू! वाचा सर्व माहिती
Diwali Photo Editing: दिवाळीमध्ये AI च्या मदतीनं तयार करा तुमचा फोटो. (Photo - Gemini AI)
मुंबई:

Diwali Photo Editing:  दिवाळीच्या (Diwali) झगमगाटात प्रत्येक क्षणाची आठवण खास असावी, अशी तुमची इच्छा आहे का? तर, आता तुम्हाला प्रोफेशनल फोटोशूट किंवा क्लिष्ट एडिटिंग सॉफ्टवेअरची गरज नाही. कारण, Google चा अत्याधुनिक AI इमेज एडिटिंग आणि जनरेशन टूल 'नॅनो बनाना' (Nano Banana) वापरून तुम्ही तुमच्या साध्या फोटोंनाही दिवाळी-थीमवर आधारित शानदार 'सिनेमॅटिक 8K HD' कलाकृतीत रूपांतरित करू शकता. Google Gemini AI चा भाग असलेला हा टूल सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याच्या मदतीने फोटो एडिट करण्याची पद्धत खूपच सोपी आहे.

'Nano Banana' चे जादूई तंत्र

तुमचा फोटो कसा दिसावा, तुमचा पोशाख (outfit) कोणता असावा आणि आजूबाजूचे वातावरण (ambience) कसे असावे, हे सर्व तुम्ही केवळ काही शब्दांत (prompts) लिहून Nano Banana AI ला सांगू शकता. हा टूल तुमच्या मूळ फोटोला (original photo) 'Hyper-realistic 4K portrait' किंवा 'Cinematic 8K HD Image' यांसारख्या उच्च रिझोल्यूशनमध्ये (resolution) बदलू शकतो.

(नक्की वाचा : Kanyadaan : 'मी कन्यादान करणार नाही...'; मुलीच्या लग्नात वडिलांची घोषणा, कारण वाचून डोळ्यात येईल पाणी, Video )
 

परफेक्ट दिवाळी फोटोसाठी 'प्रॉम्प्ट' लिहिण्याची खास ट्रिक

उत्कृष्ट फोटो मिळवण्यासाठी 'प्रॉम्प्ट' (Prompt) लिहिताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

रिझोल्यूशन: तुमच्या प्रॉम्प्टमध्ये 'Hyper-realistic 4K portrait' किंवा 'Cinematic 8K HD Image' हे कीवर्ड्स नक्की वापरा.

थीम आणि लोकेशन: दिवाळीचा अनुभव देण्यासाठी 'Diwali night', 'courtyard with rangoli', 'rooftop terrace' किंवा 'temple puja scene' यांसारख्या शब्दांचा वापर करून आकर्षक थीम स्पष्ट करा.

पोशाख आणि रंग: फोटोमध्ये तुमचे कपडे (clothes) कसे दिसले पाहिजेत? यासाठी कपड्याचा रंग (colour), डिझाइन (design) आणि स्टाइल (style) सविस्तरपणे सांगा.

प्रकाश (Lighting): दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव! त्यामुळे, फोटोमध्ये कोणत्या प्रकारचा प्रकाश (light) हवा आहे, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ: 'warm golden glow', 'soft candlelight' किंवा 'cinematic lighting' यांसारखे कीवर्ड्स तुमच्या फोटोला एक अद्भुत लूक देऊ शकतात.

एडिटिंग करताना काय काळजी घ्यावी?

AI च्या मदतीने फोटो एडिट करताना उत्तम रिझल्ट (outcome) मिळवण्यासाठी काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे:

उत्तम मूळ फोटो निवडा: तुमची मूळ (original) इमेज सर्वोत्तम असावी, ज्यात चेहरा (face) स्पष्ट दिसत असेल आणि प्रकाश (lighting) चांगला असेल. यामुळे AI जनरेटेड फोटोची गुणवत्ता (quality) सुधारते.

चेहरा कायम ठेवा: जर तुम्ही फक्त फोटो एडिट करत असाल आणि नवीन फोटो तयार करत नसाल, तर प्रॉम्प्टमध्ये 'Maintain 100% facial likeness' हा कीवर्ड वापरा, जेणेकरून तुमचा चेहरा 100% तसाच राहील.

प्रयोग करा: परफेक्ट फोटोसाठी वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून बघा. लाइटिंग, रंग आणि लोकेशनमध्ये बदल करून तुम्हाला तुमच्या कल्पनेतील अचूक फोटो (perfect photo) मिळू शकेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com