
Independence Day 2025: स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) या दोन्ही दिवशी सरकारी तसेच खासगी संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो. नागरिक देशाप्रती त्यांची भक्ती-उत्साह दाखवण्यासाठी वाहने आणि घराच्या छतावरही राष्ट्रध्वज फडकवतात. पण राष्ट्रध्वजाशी संबंधित काही नियम आहेत, जे प्रत्येकाने पाळणे बंधनकारक आहे; हे तुम्हाला माहितीये का? या लेखाद्वारे आपण ध्वज फडकवण्याच्या नियमांबाबतची माहिती जाणून घेऊया. कारण राष्ट्रध्वजाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही स्वरुपातील शिक्षा होऊ शकतात.
तिरंगा फडकवण्याचे नियम काय आहेत? (Tricolor Hoisting Rules)
- राष्ट्रध्वजाचे फडकवणे/वापरणे/प्रदर्शन हे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 आणि भारतीय ध्वज संहिता, 2002 द्वारे नियंत्रित केले जाते, ज्या अंतर्गत सार्वजनिक/खासगी संस्थेचा किंवा शैक्षणिक संस्थेचा कोणताही सदस्य कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवू शकतो.
- जेव्हा तुम्ही राष्ट्रध्वज फडकवाल तेव्हा भगवा रंग वरील बाजूस असावा, हे कायम लक्षात ठेवा.
- जेव्हा तुम्ही राष्ट्रध्वज फडकवता तेव्हा ध्वज सन्मान स्थितीमध्येच असावा.
- ध्वज फडकवताना ध्वज जमिनीला स्पर्श करता कामा नये, हे कायम लक्षात ठेवा. तसेच ध्वज अस्वच्छ जागी ठेवू नये.
- याशिवाय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज इतर कोणत्याही ध्वजाच्या खांबावर फडकवू नये.
- तसेच फाटलेला किंवा अस्वच्छ ध्वज देखील फडकवू नये.
- ध्वज फडकवताना तुम्ही त्यासमोर आदराने उभे राहिले पाहिजे.
(नक्की वाचा: Independence Day 2025 Speech Tips: 15 ऑगस्टनिमित्त प्रभावी भाषण तयार करण्यासाठी 8 सोप्या टिप्स)
वाहनावर राष्ट्रध्वज लावू शकता का?
जर तुम्ही 15 ऑगस्ट रोजी वाहनावर तिरंगा लावण्याचा विचार करत असाल तर सर्वसामान्य नागरिकांना असे करण्याची परवानगी नाही. या दिवशी केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराज्यपाल, भारतीय मिशन प्रमुख/पंतप्रधान(PM), कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि केंद्राचे उपमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, लोकसभेचे उपसभापती, राज्यांच्या विधान परिषदांचे अध्यक्ष, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे अध्यक्ष, राज्यांच्या विधान परिषदांचे उपसभापती, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपसभापती, भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीशच राष्ट्रध्वज लावू शकतात.
(नक्की वाचा: Happy Independence Day 2025 Wishes: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! स्वातंत्र्यदिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते?
राष्ट्रध्वजाचाअपमान केल्यास तीन वर्षे तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही स्वरुपातील शिक्षा होऊ शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world