जाहिरात

Jalgaon News : जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेची वेगळ्याच कारणाने वाहतूक; वाहनाचं दार उघडताच...

जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jalgaon News : जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेची वेगळ्याच कारणाने वाहतूक; वाहनाचं दार उघडताच...
AI Image

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावात रुग्णसेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा वापर चक्क दारू वाहतुकीसाठी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. एका दारूच्या दुकानासमोर मालवाहू वाहनासह रुग्णवाहिकेमध्ये दारूच्या पेट्या भरल्या जात असल्याचा दावा या व्हिडिओत केला जात आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित असलेल्या रुग्णवाहिकेचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या वाहनाचा वापर जर बेकायदेशीर वाहतुकीसाठी होत असेल, तर हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित व्हायरल व्हिडिओची प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नक्की वाचा - Shirdi News : 14 जण दगावले, तरीही हातभट्टी दारूचं व्यसन कमी होईना; मद्यपींची धक्कादायक मागणी

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दारूच्या दुकानासमोर एका मालवाहू वाहनासह रुग्णवाहिकेमध्ये दारूच्या बाटल्या भरल्या जात असल्याचं दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com