Side Effects Of Drinking Alcohol: सध्या अनेकांना असं वाटतं की, थोडं-फार दारु पिणं शरीरासाठी त्रासदायक नसतं. विशेषत: १ किंवा दोन पेग घेणं नॉर्मल मानून दारुपासून होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र तज्ज्ञांचं याबाबत वेगळचं म्हणणं आहे. दारूची सवय हळूहळू शरीराला आतून पोखरते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोलमुळे शरीराच्या अत्यावश्यक अशा पोषक तत्त्वाच्या शोषणावर परिणाम होतो. जे ऊर्जा, मेंदू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पोषक तत्त्व म्हणजे व्हिटॅमिन बी१२. ज्याची कमतरता अनेकदा बराच काळ लक्षात येत नाही आणि हळूहळू शरीराला हानी पोहोचते.
शरीराला विटॅमिन बी१२ ची आवश्यकता का असते?
विटॅमिन बी१२ शरीरात रक्त तयार करणं, मेंदू अॅक्टिव्ह ठेवणं आणि नसा मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. याचं योग्य प्रमाण असल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहते. यामुळे व्यक्तीला उत्साही वाटतं. मात्र याची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि मानसिक सुस्तीसारख्या समस्या दिसू लागतात.
अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्कोहोल पचन यंत्रणा कमकुवत करतं. यामुळे पोट, आतड्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो.ज्यामुळे शरीर व्हिटॅमिन बी१२ योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते. याशिवाय याचा लिव्हरवरही परिणाम होतो. ज्यामुळे शरीरात पोषक तत्व स्टोअर करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीर हळूहळू आतून कमकुवत होऊ लागतं.
कोणाला जास्त धोका?
जे लोक नियमितपणे दारू पितात, त्यांच्यात ही समस्या जास्त पाहायला मिळते. याशिवाय वृद्ध, शाकाहारी आणि कमकुवत पचनशक्ती असणाऱ्या लोकांमध्ये विटॅमिन बी१२ च्या कमतरतेचा धोका अधिक असतो. जर या स्थितीत दारूचं व्यसन लागलं तर समस्या अधिक वाढू शकते.
या लक्षणांकडून दुर्लक्ष करू नका
जर तुम्हाला वारंवार थकवा, कमजोरी, चक्कर येणं, हात पायाला मुंग्या येणं, फोकस करण्यास अडचण येत असेल तर शरीरात विटॅंमिट बी १२ ची कमतरता असू शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं भारी पडू शकतं.
स्वत:चा कसा बचाव कराल?
दारुचं प्रमाण कमी करणं हे पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे. सोबतच दूध, दही, अंडी आणि फोर्टिफाइड फूड्सचा डाएटमध्ये समावेश करा. आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटॅमिन बी१२ सप्लीमेंट घेता येऊ शकते. योग्य वेळेत लक्ष दिल्यास या समस्येपासून तुम्ही वाचू शकता आणि शरीर आतून मजबूत ठेऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world