
Dry Ginger With Milk Benefits: चहामध्ये आलं आपण सर्वात जास्त वेळा वापरतो. कारण ते केवळ चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते. सुक्या आल्याला सुंठ म्हणतात. सुंठीच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, आल्याप्रमाणेच सुंठामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम, व्हिटॅमिन ए आणि सी, जस्त, फोलेट ॲसिड आणि फॅटी ॲसिडचे गुणधर्म आढळतात. सुंठीचा गुणधर्म उष्ण असतो. ज्याप्रमाणे चहामध्ये आल्याचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे सुंठ दुधामध्ये सर्वात जास्त वापरली जाते. सुंठीचे दूध अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते.
सुंठीचे दूध पिण्याचे फायदे
पचन
सुंठ (सुके आले) पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. त्याच बरोबर गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ते दुधात मिसळून पिऊ शकता. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
सर्दी आणि खोकला
सुंठामध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) आणि जीवाणू-विरोधी (anti-bacterial) गुणधर्म असतात. जे सर्दी आणि खोकला कमी करण्यास मदत करू शकतात.
नक्की वाचा - Curd Benefits: चुकीच्या वेळेत दही खाताय? दही खाण्याची 'ही' आहे योग्य वेळ
सांधेदुखी
सुंठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती
सुंठ आणि दूध दोन्हीमध्ये पोषक तत्वे असतात. जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि विषाणूजन्य संसर्गापासून (viral infection) वाचण्यासाठी तुम्ही सुंठीच्या दुधाचे सेवन करू शकता.
तणाव
रात्री झोपण्यापूर्वी सुंठीचे दूध प्यायल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, यामुळे तुम्हाला झोपही चांगली लागते.
नक्की वाचा - Health News: 'या' 5 हेल्दी ब्रेकफास्टने दिवसाची सुरुवात करा, राहाल कायम फिट
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world