Effect of Coffee on Memory : कॉफीसंदर्भात आलेला एक अभ्यास कॉफी प्रेमींसाठी सावधानतेचा इशारा मानला जात आहे. मेडिकल जर्नर नेचर कम्युनिकेशननुसार, सतत कॉफी पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. या संशोधनानुसार, कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत कॉफी न पिणाऱ्यांची स्मरणशक्ती चांगली असल्याचं समोर आलं आहे. दररोज कॉफी प्यायल्याने मेंदूची क्षमता कमी होऊ शकते. या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सतत कॉफी पिणे मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते.
१. स्मरणशक्तीवर परिणाम
या संशोधनानुसार, जे लोक कॉफी पित नाहीत त्यांची स्मरणशक्ती कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत चांगली असल्याचं समोर आलं आहे. नियमितपणे कॉफी पिणाऱ्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो.
२. वर्तणुकीतील बदल
कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये विचार न करता कृती करणे आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याचं प्रमाण जास्त आढळले आहे. मात्र, कॉफी सोडल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत या वर्तणुकीत सुधारणा झाल्याचेही दिसून आले.
३. पोटातील बॅक्टेरिया आणि मेंदूचा संबंध
संशोधनात असंही आढळून आलं की, दररोज कॉफी प्यायल्याने आतड्यांमध्ये 'क्रिप्टोबॅक्टेरियम' आणि 'एगर्थेला' नावाच्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. हे बॅक्टेरिया मेंदूतील महत्त्वाचे न्यूरोट्रांसमीटर कमी करतात. ज्यामुळे मानसिक क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
कॉफीचे फायदे...
'डिकॅफ' कॉफी प्यायल्याने काही गोष्टी शिकण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेत सुधारणा दिसून आली. कोणत्याही प्रकारची कॉफी तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करू शकते.
( Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world