
Benefits Of Black Coffee For Liver: काही लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याचे इतके व्यसन असते की जोपर्यंत चहा-कॉफी प्यायला मिळत नाही तोवर त्यांच्या दिवसाची सुरुवात शांततेत होत नाही. तुम्हाला देखील ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे का? याचे यकृतावर (Liver) नेमके काय परिणाम होतात आणि दिवसभरात दोन ते तीन कप ब्लॅक कॉफी (Black Coffee Benefits) प्यायल्यास काय होते? तुमची ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
ब्लॅक कॉफी प्यायल्यास लिव्हरवर कोणते दुष्परिणाम होतात? (Effects Of Black Coffee On Liver)
- इन्स्टाग्रामवरील podwithnik and gastroliver.care या हँडलवर ब्लॅक कॉफीशी संबंधित व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
- व्हिडीओतील माहितीनुसार, तुम्हाला दिवसभरात तीन ते चार कप ब्लॅक कॉफी पिण्यास सवय असेल तर यामुळे यकृतातील फॅट्स कमी होण्यास मदत मिळू शकते.
- ब्लॅक कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससह अन्य कम्पाउंड्स आहेत, ज्यामुळे यकृतामध्ये होणारी जळजळ आणि फायब्रोसिसची समस्या कमी होण्यासही मदत मिळते.
- ब्लॅक कॉफीमुळे लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. लिव्हर फायब्रोसिस, फॅटी लिव्हर आणि हेपेटायटिस यासारख्या आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Coffee Benefits: महिलांनी कॉफी का प्यावी?)
ब्लॅक कॉफी पिण्याचे अन्य फायदे (Back Coffee Benefits)
- वजन कमी होण्यास मदत मिळते.
- ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते, यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळते.
- भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Jaggery Tea Recipe : गुळाचा चहा कसा तयार करावा? मिळतील इतके फायदे)
ब्लॅक कॉफीमुळे शरीराला ऊर्जा मिळते
- ब्लॅक कॉफीमुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत मिळते.
- कॅफीनमुळे मेंदूची सतर्कता वाढते.
- वर्कआऊट करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी प्यायल्यास तुम्हाला लगेचच ऊर्जा मिळू शकते.
- नियमित स्वरुपात ब्लॅक कॉफी प्यायल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक
- ब्लॅक कॉफीतील घटक हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत.
- रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.
नैराश्य आणि चिंतेची समस्या दूर होते (Black Coffee Reduces Depression and Anxiety)
ब्लॅक कॉफीतील पोषक घटकांमुळे शरीरामध्ये डोपामाइन आणि सेरेटोनिन यासारख्या हार्मोन्सचा स्त्राव होण्यास मदत मिळते; यामुळे नैराश्य, ताणतणावाची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
पचनप्रक्रिया (Digestive System)
ब्लॅक कॉफीमुळे शरीराची पचनप्रक्रिया मजबूत होते, यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ बद्धकोष्ठता, अपचन, इत्यादी...
ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत
- साखरेशिवाय ब्लॅक कॉफी प्यावी.
- नियमित केवळ दोन ते तीन कपच ब्लॅक कॉफी प्यावी, अन्यथा झोपेशी संबंधित समस्या, भीती आणि अॅसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
- सकाळी किंवा वर्कआऊट करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पिऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world