जाहिरात

BAKRA EID 2025 : हलाल करण्यापूर्वी बकऱ्याचे दात का मोजतात? कोणाची कुर्बानी ग्राह्य धरली जात नाही?

इस्लामिक कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या जुल-हिज्जाच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. 

BAKRA EID 2025 : हलाल करण्यापूर्वी बकऱ्याचे दात का मोजतात? कोणाची कुर्बानी ग्राह्य धरली जात नाही?

बकरा ईदचा सण इस्लामिक समाजातील महत्त्वाचा उत्सव आहे. या सणाच्या दिवशी बकऱ्यासह काही जनावरांची कुर्बानी दिली जाते. यंदाच्या वर्षी 7 जून रोजी बकरी ईद म्हणजे उल अजहा साजरी केली जाणार आहे. चंद्र दिसल्याच्या दहा दिवसांनंतर नेमकी तारीख जाहीर केली जाईल. बकरी ईद, ईद उल फितरच्या दोन महिने नऊ दिवसांनंतर साजरी केली जाते. इस्लामिक कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या जुल-हिज्जाच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुर्बानीपूर्वी बकऱ्याचे दात का मोजतात? 
बकरा ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र बकऱ्याची कुर्बानी देण्यापूर्वी त्याचे दात का मोजले जातात हे फार कमी जणांना माहीत असेल. दात मोजल्याने बकऱ्याचं वय लक्षात येतं. कुर्बानी केवळ एक वर्षांच्या बकऱ्याची दिली जाते. त्याहून कमी वयाच्या बकऱ्याची कुर्बानी देणं योग्य मानलं जात नाही. बकऱ्याचे दात 4-6 असेल तर तर तो एक वर्षांचा मानला जातो. दात कमी असतील तर त्याची कुर्बानी दिली जात नाही. याशिवाय सहाहून जास्त दात असतील तरी ती कुर्बानी योग्य मानली जात नाही. बकरी ईदच्या लहान किंवा मोठ्या बकऱ्याची कुर्बानी ग्राह्य मानली जात नाही. 

कोणाची कुर्बानी दिली जाते?
शरीअतनुसार, कुर्बानीसाठी कोणत्याही एका प्राण्याची सक्ती नाही. बकरी/बकरा, मेंढी/मेंढा, म्हैस/रेडा, उंट यापैकी कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देता येते. 

जनावरांचं वय किती असावं?
शेळी/मेंढीचे वय - 1 वर्ष 
मेंढी/कोकरूचं वय - 1 वर्ष (जर ते ६ महिन्यांचे असेल परंतु मोठे दिसत असेल तर ते देखील ग्राह्य धरले जाते)
म्हशीचे वय - 2 वर्षे 
उंटाचे वय - 5 वर्षांहून जास्त नको


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com