जाहिरात

Electricity Bill Reduction: विजेचं बिल कमी करण्यासाठी सोप्या टीप्स फॉलो करा? महिनाभरात दिसेल फरक

अनेक राज्यांमध्ये 100 अतिरिक्त युनिट्समुळे वीज दर वाढतो आणि बिल अचानक वाढते. पण काही सोपे बदल करून तुम्ही या आर्थिक बोजापासून सहज वाचू शकता.

Electricity Bill Reduction: विजेचं बिल कमी करण्यासाठी सोप्या टीप्स फॉलो करा? महिनाभरात दिसेल फरक

Electricity Bill Reduction Tips:  विजेचं बिल जास्त येतंय, अशी अनेकांचा ओरड असते. मात्र वीज बिल कमी कसं करायची हे अनेकांना कळत नाही. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दरमहा फक्त 100 युनिट वीज वाचवल्यास, तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा जास्त बचत करता येऊ शकते. अनेक राज्यांमध्ये 100 अतिरिक्त युनिट्समुळे वीज दर वाढतो आणि बिल अचानक वाढते. पण काही सोपे बदल करून तुम्ही या आर्थिक बोजापासून सहज वाचू शकता.

वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स वापरा

पंखे बदलून मोठी बचत

घरातील जुने 80W चे सीलिंग फॅन जर दिवसातून 20 तास चालू असतील, तर ते एका महिन्यात सुमारे 48 युनिट वीज वापरतात. जर तुम्ही तीन जुने पंखे बदलले, तर दरमहा 87 युनिट्सची बचत होऊ शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे नवीन पंखे खरेदी करण्यासाठी आलेला खर्च 6 ते 8 महिन्यांत वसूल होतो.

(नक्की वाचा-  Free AI Courses : जगात बोलबाला असलेल्या क्षेत्रात करिअरची संधी; सरकारकडून 5 मोफत AI कोर्सेस)

लाइटिंग आणि पाण्याच्या मोटरकडे

40W च्या ट्यूब लाइटच्या जागी 18W च्या एलईडी लाइटचा वापर केल्यास, घरात चार लाइट्स 10 तास वापरल्यास महिन्याला सुमारे 26 युनिट वीज वाचू शकते. याव्यतिरिक्त, पाण्याची मोटर वेळोवेळी साफ करणे आणि पाईपलाइनमधील गळती दुरुस्त केल्यास 10 युनिटपर्यंत बचत होऊ शकते.

एसीची वेळेत देखभाल करा

एसीचे कंडेन्सर कॉइल्स दर 15 दिवसांनी साफ केल्यास कूलिंग अधिक चांगले होते आणि वीज वापर कमी होतो. एसीचे तापमान 24 डिग्री सेल्सिअसवर सेट ठेवल्यास अतिरिक्त लोडपासून बचाव करता येतो. तसेच, आधुनिक फ्रिज आणि टीव्हीला व्होल्टेज स्टेबलायझरची गरज नसते. हे उपकरणे काढल्यास 30 ते 45 युनिट्सची बचत करणे शक्य आहे.

(नक्की वाचा-  Flipkart Freedom Sale: आयफोन 15, आयफोन 16 Pro आणि 16 Pro Max वर 23 हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट)

अनावश्यक उपकरणे बंद करा

आपण वापरत नसतानाही अनेक उपकरणे वीज वापरत राहतात. मोबाइल चार्जर, सेट-टॉप बॉक्स आणि टीव्हीचा वापर झाल्यावर प्लग बंद करण्याची सवय लावल्यास 5 ते 10 युनिट्सची बचत होऊ शकते. वीज विभागही नियमित 'वीज ऑडिट' करण्याचा सल्ला देतो, जेणेकरून अचानक वाढलेल्या बिलांपासून वाचता येईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com