जाहिरात
Story ProgressBack

दररोज सायंकाळी दरवाज्याजवळ तुम्ही दिवा लावता? या गोष्टींकडे दुर्लक्ष नको

दिवा नेहमी उजव्या बाजूलाच लावायचा प्रयत्न करावा. याशिवाय जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर या दिशेलाच दिवा लावावा.

Read Time: 2 min
दररोज सायंकाळी दरवाज्याजवळ तुम्ही दिवा लावता? या गोष्टींकडे दुर्लक्ष नको
मुंबई:

Vastu Tips: हिंदू धर्मात दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पूजा आणि धार्मिक विधींव्यतिरिक्त अनेक सण-उत्सवात घरात दिवे लावले जातात. दिव्याचा सकारात्मक ऊर्जेशी संबंध असल्याचे दिसून येते. तुम्ही आजूबाजूला अनेकांना पाहिलं असेल जे सायंकाळच्या वेळेत घराच्या दरवाज्यावर दिवा लावतात. संध्याकाळ हा देवाच्या भक्तीचा काळ मानला जातो. यावेळी पूजा केल्याने विशेष लाभ होतो, असं म्हटलं जातं. 

दरवाज्याजवळ दिवा का लावतात?
घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावल्याने घरात सकारात्मका राहते. घरात नकारात्मक ऊर्जा राहिल्याने तणाव आणि वाद होत राहतात. घरात सुख-शांती नांदत नाही. अनेकदा घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल तर अशावेळी घरात नियमितपणे दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो. घरात आर्थिक चणचण असेल तर दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो. ज्यातून आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. याशिवाय कर्जातूनही सुटका मिळू शकते. 

अनेकदा वास्तूदोष असल्याने घरात सुख-शांती राहत नाही. तर मानसिक ताणाचाही सामना करावा लागतो. घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावला जातो. कधी दिवा लावावा, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत दिवा लावू शकता. तुम्ही घराच्या मुख्य दाराजवळ दिवा ठेवू शकता किंवा घराच्या बाहेरील कठड्यावरही दिवा ठेवू शकता. दिवा लावताना दिशेकडेही लक्ष द्यावे.


दिवा नेहमी उजव्या बाजूलाच लावायचा प्रयत्न करावा. याशिवाय जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर या दिशेलाच दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. संध्याकाळ हा राहूचा काळ मानला जातो. संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने अनेक शुभ फळ मिळतात. घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. यामुळे राहूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो. 

संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घराची समृद्धी कायम राहते. घरात लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. यासोबतच घरात लक्ष्मीचे आगमन होते. देवी लक्ष्मी घरातील लोकांना समृद्धी देते. त्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत राहते. हे दारिद्र्य, रोग आणि दुःखापासून मुक्तता देते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination