NDTV
खेळता खेळता लहान मुलं बऱ्याचदा अशा वस्तू उचलतात जे त्यांच्या डोळ्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जर चुकून डोळ्यात Feviquick किंवा फेविकॉलसारखा ग्लू गेला, तर घाईघाईत उचललेले एक चुकीचं पाऊल गंभीर नुकसानास कारणीभूत ठरू शकतं. अशा परिस्थितीत कोणती पहिली पाऊले उचलावीत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, हे डॉ. दीपिका गर्ग यांनी स्पष्ट केलं आहे.
नुकतच दीपिका गर्ग यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंबंधित एक व्हिडिओ शेयर केला आणि पालकांना अलर्ट केलं आहे. जर डोळ्यात फेविक्विक किंवा तत्सम पदार्थ गेल्यास काय करायला हवं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
डॉक्टर गर्ग यांनी सांगितलं, फेविक्विकमध्ये Cyanoacrylate असतं. जे एक केमिकल आहे. यामुळे पापण्या चिकटतात. यामुळे डोळ्यात जळजळ होऊ शकते, डोळे लाल होऊ शकतात. याशिवाय कॉर्नियावर व्रण देखील येऊ शकतात. अशात मेडिकस इमर्जन्सीची परिस्थिती उद्भवू शकते. अशा स्थिती घाबरू नका, तर शांत डोक्याने हे हाताळा.
डोळ्यात फेविक्विक गेलं तर काय करू नये...
- यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते.
- पापण्यांचे केस गळून पडू शकतात किंवा डोळ्याच्या आतील भागाला इजा होऊ शकते.
- अशावेळी डोळे चोळू नका, यामुळे ग्लूमुळे अधिक नुकसान होऊ शकतं आणि कॉर्नियावर व्रण येऊ शकतात.
- डोळ्यात कधीही अॅसिटोन, नेल पॉलिश रिमूव्हर किंवा पेंट थिनर टाकू नये, या केमिकल्समुळे डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.
तातडीने हे पाऊल उचला...
- सर्वात आधी ज्या डोळ्यात फेविक्विक गेला आहे, ते वाहत्या पाण्याखाली म्हणजेच नळाच्या पाण्याखाली २० मिनिटे धुवा.
- यामुळे ग्लूचे छोटे कण निघून जातील
- आता, नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्या किंवा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात जा.
- तिथे सलाईन वॉटरने डोळे स्वच्छ धुवुन गोंद काढला जाईल.
संपूर्ण बातमी वाचा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world