जाहिरात

IIT नव्हे इंजिनियरिंगची डिग्री, 2.6 कोटींचं पॅकेज; पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त 'स्किल्स'वर फोकस करुन मिळवलं यश

एका छोट्या गावात राहणाऱ्या पृथ्वीराजने जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनी एनवीडियामध्ये आपलं स्थान मिळवलं आहे.

IIT नव्हे इंजिनियरिंगची डिग्री, 2.6 कोटींचं पॅकेज; पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त 'स्किल्स'वर फोकस करुन मिळवलं यश

तुमचा दृढनिश्चय असेल तर कोणताही रस्ता कठीण नसतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एक कहाणी व्हायरल होत आहे. ही कहाणी एका खेड्यात राहणाऱ्या पृथ्वीराजची आहे. एका छोट्या गावात राहणाऱ्या पृथ्वीराजने जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनी एनवीडियामध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. इतकच नाही तर त्याला मिळालेलं पॅकेजही खास आहे. त्याला तब्बल २.६ कोटींचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे. तो AI टेक्नॉलॉजीला चालविणाऱ्या एडव्हान्स चिप्स डेव्हलप करणाऱ्या टीमचा भाग आहे. विशेष बाब म्हणजे पृथ्वीराजकडे IIT ची डिग्री नाही. 

IIT शिवाय ही नोकरी कशी मिळवली?

लिंक्डइनवर शेयर केलेल्या या पोस्टमध्ये दिल्यानुसार, पृथ्वीराजने बंगळुरूच्या PES विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असताना त्याने केवळ पुस्तकी अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही तर विविध स्किल्स शिकला. अभ्यासासह तो वारंवार विविध प्रोजेक्टसाठी काम करीत होता. इंटर्नशिप केली आणि वर्गात शिकवल्या न जाणाऱ्या टेक्निकवर फोकस केला. 

नक्की वाचा - 30 तारखेला पगार अन् 1 ला खिसा रिकामा; चांगला पगार असतानाही ही अवस्था का? तज्ज्ञांनी दिला मोठा सल्ला

Latest and Breaking News on NDTV

पृथ्वीराजसाठी ही केवळ एक नोकरी नाही. तो कर्नाटकातील चित्रकूट जिल्ह्यातील एक लहानशा खेड्यातून आला आहे. अशा ठिकाणी राहून विविध तंत्रज्ञान आत्मसात करणं सोपं नव्हतं. पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केल्यानंतर पृथ्वीराजचा प्रवास सोपा नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, तो मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेला गेला. आर्थिक चणचण आणि योग्य मार्गदर्शन नसताना त्याने टियर-३ विद्यापीठात प्रवेश घेतला. अर्ज करण्यापासून करियरच्या योजनेपर्यंत अधिकांश गोष्टी त्याने स्वत: शिकल्या. प्रचंड मेहनत आणि सतत शिकत राहत असल्याने त्याला एडवीडियाची मुलाखत उत्तीर्ण केली. आज तो एनवीडियाच्या डीप लर्निंगच्या टीममध्ये काम करीत आहे. त्याला वर्षाला तब्बल २.६ कोटींचं (२,७५,००० डॉलर) पॅकेज आहे. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com