
Flipkart Big Bang Diwali Sale मध्ये ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आहे. भारतात 20 ऑक्टोबरपासून दिवाळी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने फ्लिपकार्टवर स्मार्टफोन, हेडफोन्स, स्मार्टवॉच, टॅबलेट आदी वस्तूंवर मोठी सवलत आहे. यामध्ये प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड्स ज्यात Samsung, Vivo, Oppo, आणि Nothing सारखे मोबाइल स्वस्त दरात खरेदी करता येऊ शकतात. येथे आम्ही तुम्हाला प्रसिद्ध ब्रँड्सच्या 20 हजार रुपयांहून कमी दरात मिळणाऱ्या स्मार्टफोनटी संपूर्ण यादी सांगणार आहोत.
Flipkart Big Bang Diwali सेलमध्ये ग्राहकांना Samsung, Vivo, Oppo, आणि Nothing सारख्या प्रसिद्ध बँड्सचे स्मार्टफोन स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी आहे. सेलमध्ये सांगितलेले स्मार्टफोन सवलतीच्या दरात खरेदी करता येऊ शकतात. असाच एक फोन आहे Vivo T4x 5G. हा फोन सेलमध्ये स्वस्त किमतीत उपलब्ध आहे. याचा 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज वेरिएंट देण्यात आला आहे. जाणून घेऊया या सेलमध्ये काय काय मिळतंय...
Vivo T4x 5G (6GB RAM + 128GB Storage)
Vivo T4x 5G हा मोबाइल फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अवघ्या 13,499 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. याची मूळ किंमत 17,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.72 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 120Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामध्ये 6500mAh ची बॅटरी आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन डाइमेंसिटी 7300 5G चिपसेटवर चालतो.
नक्की वाचा - New Car inspection: दिवाळीत नवी कार घेताय? 'या' 6 गोष्टी शोरुममध्येच तपासून घ्या
Realme P3x 5G (6GB RAM + 128GB Storage)
Realme P3x 5G हा मोबाइल सेलमध्ये 10,249 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. फोनची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.72 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 6000mAh ची बॅटरी आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. फोन Dimensity 6400 चिपसेटवर चालतो.
Oppo K13x 5G (6GB RAM + 128GB Storage)
Oppo K13x 5G मोबाइल फ्लिपकार्ट सेलमध्ये अवघ्या 12,999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. फोनची मूळ किंमत 16,999रुपये आहे. यात 6.67 इंचाचा एचडीप्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. यामधये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy F36 5G (6GB RAM + 128GB Storage)
Samsung Galaxy F36 5G हा फोन सेलमध्ये 13,999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. याची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. आणि 5000mAh ची बॅटरी आहे. डिवाइसमध्ये 6.7 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world