जाहिरात

New Car inspection: दिवाळीत नवी कार घेताय? 'या' 6 गोष्टी शोरुममध्येच तपासून घ्या

Tips For Buying New Car Before Taking delivery: आपण आपल्या नवीन कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी काही आवश्यक प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन (PDI) म्हणजेच वितरणापूर्वीची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

New Car inspection: दिवाळीत नवी कार घेताय? 'या' 6 गोष्टी शोरुममध्येच तपासून घ्या

New Car Pre-delivery inspection checklist: राज्यासह देशभरात दिवाळीच्या सणाची धामधुम सुरु आहे.  दिवाळीच्या उत्सवात, धनत्रयोदशी, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण नवे वाहन खरेदी करतात. या काळात अनेक लोक आपल्या घरी नवीन कारची डिलिव्हरी (New Car Delivery) घेतात. कार उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक सूट आणि ऑफर्स देत असल्या तरी, आपण आपल्या नवीन कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी काही आवश्यक प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन (PDI) म्हणजेच वितरणापूर्वीची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या तपासणीमुळे संभाव्य दोष किंवा त्रुटी वेळेत लक्षात येतात. गाडी घरी आणताना नेमक्या कोणत्या गोष्टी पाहाव्यात? वाचा... 

१. बाह्य भागाची तपासणी (Exterior Inspection):

पेंट आणि डेंट: कारला थेट प्रकाशात काळजीपूर्वक पाहा. पेंटवर कोणतीही खराबी, ओरखडा (Scratch) किंवा डेंट (Dent) नाही ना, याची खात्री करा.

शेड्समधील फरक: गाडीच्या वेगवेगळ्या पॅनेल्सवरील पेंटच्या रंगांमध्ये (Shades) कोणताही फरक नाही ना, हे तपासा.

'स्वर्ल मार्क्स': गाडीच्या पृष्ठभागावर 'स्वर्ल मार्क्स' (Swirl Marks) तर नाहीत ना, हे तपासा. असे मार्क्स गाडीची खराब हाताळणी दर्शवतात.

Shubh Muhurt 2025: नवी गाडी, घर खरेदी करताय? 'हे' शुभ मुहूर्त चुकवू नका; पाहा संपूर्ण माहिती

२. इंजिन आणि बॅटरी तपासणी:

लिक्विड लेव्हल्स: इंजिनचा हूड (Hood) उघडून इंजिन ऑईल, कूलंट (Coolant) आणि ब्रेक फ्लुईडसह सर्व द्रव्यांचे स्तर (Levels) तपासा. तसेच, कोणतेही लीकेज (Leakage) होत नाही ना, याकडे लक्ष द्या.

वेल्डिंग जोड्या: वेल्डिंगच्या जोडांवर बारकाईने नजर टाका आणि कोणतीही तुटफूट दिसल्यास त्वरित डीलरशिप (Dealership) कर्मचाऱ्यांना कळवा.

बॅटरी टर्मिनल: बॅटरी टर्मिनलवर जंग (Rust) किंवा कोणतीही तार ढिली (Loose Wire) नाही ना, याची तपासणी करा.

३. टायर आणि चाके:

टायरची स्थिती: स्पेयर व्हीलसह (Spare Wheel) सर्व टायर नवीन आहेत आणि त्यांचे आयुष्य (Manufacturing Date) तपासले आहे, याची खात्री करा. टायरांमध्ये हवेचा दाब (Air Pressure) योग्य आहे की नाही, हे तपासा.

Astro Tips After Buying New Car: नवी गाडी घेताय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा; वाईट नजरेपासून होईल रक्षण

४. एसी आणि हीटर:

कार्यक्षमता: एअर कंडिशनर (AC) आणि हीटर दोन्ही सुरू करून ते व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत, हे तपासा.

आवाज आणि वास: एसी किंवा हीटरमधून कोणताही अजीब आवाज किंवा दुर्गंधी (Smell) येत नाही ना, याकडे लक्ष द्या.

५. अंतर्गत भागाची तपासणी (Interior Inspection):

डाग आणि ओरखडे: कारच्या आतल्या भागात (Interior) कोणतेही डाग (Stains) किंवा ओरखडे नाहीत ना, हे तपासा.

सीट बेल्ट: सीट बेल्ट (Seat Belt) पूर्णपणे बाहेर ओढून पाहा की, तो व्यवस्थित काम करत आहे.

६. कागदपत्रे आणि ॲक्सेसरीज (Documents and Accessories):

आवश्यक कागदपत्रे: ओनर मॅन्युअल, वॉरंटी कार्ड आणि विमा (Insurance) यासह सर्व आवश्यक कागदपत्रे तपासा.

क्रमांक जुळवा: व्हीकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN) आणि इंजिन नंबर तुमच्या नोंदींशी (Records) जुळत आहेत की नाही, हे तपासा.

उपकरणे: स्पेयर व्हील, जॅक (Jack), टूलकिट, अतिरिक्त चाव्या (Duplicate Keys) आणि इतर सर्व ॲक्सेसरीज (Accessories) उपस्थित आहेत आणि त्या योग्यरित्या काम करत आहेत, याची खात्री करा.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com