Foods to avoid during Nautapa : नवतपाची सुरुवात होताच उकाडा सर्वात धोकादायक स्तरापर्यंत पोहोचतो. कडक ऊन, गरम हवा आणि सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे शरीर थकतं. अशा वातावरणात केवळ बाहेरील उकाडाच नाही, तर खाण्याच्या सवयींचाही तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. Sahyadrihospital च्या रिपोर्टनुसार, उकाड्यादरम्यान काही पदार्थ खाल्ल्याने शरीराचं तापमान अधिक वाढू शकतं. ज्यामुळे डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक, उलट्या, जुलाब आणि अशक्तपणासारख्या समस्यांचा धोका वाढतो. यासाठी नवतपामध्ये खाण्या-पिण्याबाबत अधिक अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे.
तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा...
तज्ज्ञांनुसार, तळलेले-फ्रोझन पदार्थ उदा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फाइज आणि तळलेले किंवा तेलकट पदार्थ उन्हाळ्यात शरीरावर अतिरिक्त दबाव आणतात. असे पदार्थ पचायला शरीराला जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे अंतर्गत उष्णता वाढू शकते. याशिवाय जास्त मसालेदार पदार्थदेखील नवतपामध्ये त्रास वाढवू शकतो. मिरचीतील घटकांमुळे शरीरातील तापमान वाढू शकतं. विशेषत: ज्या व्यक्तींना मसालेदार पदार्थ खाण्याची सवय नाही अशांना या पदार्थांपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. याशिवाय लाल मासापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. रेड मीट पचविण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा खर्च करतं, ज्यामुळे शरीराचं तापमान वाढू शकतं.
कोल्डड्रिंकपासून लांबच राहा...
कोल्ड ड्रिंक आणि सोड्याचं पेय उन्हाळ्यात तात्पुरता दिलासा देत असले तरी तज्ज्ञांनुसार, या पेयांमधील अतिरिक्त साखरेमुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. यामुळे अशी पेय जास्त प्रमाणात पिणं त्रासदायक ठरू शकतं. याशिवाय चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिन शरीराला डिहायड्रेट करू शकतं, परिणामी शरीराचं तापमान वाढण्याची भीती असते.
नक्की वाचा - Nautapa News : 9 दिवसात रडकुंडीला आणणारा उकाडा, नवतपा पडला नाही तर काय होईल?
पाकिटबंद पदार्थ त्रासदायक...
आरोग्यतज्ज्ञांनुसार, जास्त मीठ असलेले पाकिटबंद स्नॅक्स उदा. चिप्स आणि फरसाण शरीरातील द्रव्याचं संतुलन बिघडू शकतं. अधिक सोडियम शरीरातील सेल्समधून पाणी खेचतं. ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रेड मीट आणि अतिरिक्त आहार पचविण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे उकाडा आणि आळस जाणवू शकतो.
शिळं अन्न टाळा...
नवतपाच्या दरम्यान शिळं अन्न किंवा उघड्यावर ठेवलेले पदार्थ टाळा. तीव्र उकाड्यामुळे अन्न लवकर खराब होतं. ज्यामुळे फूड पॉइजनिंग, जुलाब, टायफॉइडसारख्या समस्यांचा धोका वाढतो. अतिशय थंड पदार्थांमुळेही शरीराचं तापमान झटक्यात कमी होतं. त्याशिवाय दारूमुळे शरीरातील पाणी जलद गतीने बाहेर काढलं जातं. ज्यामुळे गंभीर डिहायड्रेशनचा धोका असतो.
कोणते पदार्थ खायला हवेत?
नवतपामध्ये शरीरात थंड आणि हायड्रेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नारळपाणी, ताक, लस्सी, सत्तू, बेलाचं सरबत, ताजी फळं याचं सेवन फायदेशीर ठरतं. दिवसभर पुरेसं पाणी प्यायला हवं आणि रिकाम्या पोटी घराबाहेर जाऊ नका. योग्य आहार आणि जीवनशैली आत्मसात केल्यास नवतपाच्या भीषण उकाड्याचा परिणाम बऱ्याच अंशी कमी केला जाऊ शकतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world