- हिवाळ्यात कमी तापमानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे योग्य आहार गरजेचा ठरतो
- तुपामध्ये असलेले फॅटी ॲसिड्स शरीराला नैसर्गिकरित्या गरम ठेवण्यास मदत करतात आणि मेटाबॉलिज्म सुधारतो
- नट्स आणि बिया प्रथिने व फॅटी ॲसिड्समुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असतात
Foods to Keep Body Warm in Winters: हिवाळ्याचा (Winter) ऋतू जितका आल्हाददायक वाटतो, तितकाच या काळात आजारपण वाढण्याचा धोका असतो. कमी तापमान, थंड हवा आणि नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत असल्यामुळे शरीर लवकर आजारी पडते. अशावेळी शरीराला थंडीपासून वाचवणे अत्यंत आवश्यक असते. गरम कपड्यांव्यतिरिक्त, शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
थंडीपासून वाचवणारे नैसर्गिक घटक
काही खाद्यपदार्थ असे आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता (Heat) निर्माण होते. थंडीचा परिणाम कमी होतो. हे पदार्थ हिवाळ्यात खाल्ल्यास थंडीची तीव्रता जाणवत नाही आणि काहीवेळ तर रात्री झोपताना ब्लँकेट घेण्याचीही गरज पडत नाही.
1. तूप (Ghee)
तुपामध्ये फॅटी ॲसिड्स (Fatty Acids) भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराला नैसर्गिकरित्या गरम ठेवण्यास मदत करतात. थंडीपासून वाचण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एक चमचा तूप मिसळून पिणे फायदेशीर ठरते. तसेच, पोळीला तूप लावून किंवा डाळीत तूप घालून खाल्ल्याने सांधे (Joints) मजबूत होतात आणि मेटाबॉलिज्म (Metabolism) सुधारते.
2. नट्स (Nuts) आणि बिया (Seeds)
हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी नट्स आणि बिया खाणे उत्तम आहे. बदाम, अक्रोड (Walnut), तीळ आणि जवस (Flax Seeds) खाणे खूप फायदेशीर ठरते. यातील प्रथिने (Protein) आणि फॅटी ॲसिड्स (Fatty Acids) शरीराला उष्णता देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
3. मध (Honey) आणि गूळ (Jaggery)
मध खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मौसमी आजार दूर राहतात. तसेच, मध शरीराला उष्णता देण्यासाठीही लाभदायी मानला जातो. याशिवाय,
4. गूळ खाणेही हिवाळ्यात खूप महत्त्वाचे आहे. गुळाची तासीर गरम असते आणि रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास शरीराचे तापमान गरम राहते. गूळ खाल्ल्याने पचनक्रिया (Digestion) आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत होते व सर्दी-खोकल्यापासून (Cold and Cough) आराम मिळतो.
4. गरम तासीरचे मसाले
घरातील काही मसाले केवळ जेवणाची चव वाढवत नाहीत, तर आरोग्याच्या समस्याही दूर करतात. लवंग (Clove), मिरी (Black Pepper), दालचिनी (Cinnamon) यांसारख्या मसाल्यांच्या सेवनाने शरीर नैसर्गिकरित्या गरम राहते, तसेच पचनसंस्था आणि रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world