जाहिरात

Footwear Vastu Tips: बुट-चपलांचा शनी ग्रहाशी काय संबंध काय? कसे बिघडते तुमचे भाग्य? या 9 गोष्टी टाळू नका

Footwear Vastu Tips: तुमच्या जोडे-चपलांचा संबंध थेट शनी ग्रहाशी असतो, हे तुम्हाला माहीत आहे का? जोडे खरेदी करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे, ते कोणत्या दिशेला ठेवावे आणि चुकूनही कोणाकडून जोडे भेट का घेऊ नये? वाचा सविस्तर माहिती...

Footwear Vastu Tips: बुट-चपलांचा शनी ग्रहाशी काय संबंध काय? कसे बिघडते तुमचे भाग्य? या 9 गोष्टी टाळू नका
"Footwear Vastu Tips: बुटांशी संबंधित वास्तूचे नियम"
Canva

Footwear Vastu Tips: अनेकदा आपण लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज त्यांनी पायात घातलेल्या बुटांवरून किंवा चपलांवरून लावण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या फुटवेअरचा संबंध तुमच्या नशिबाशी (गुड लक आणि बॅड लक) सुद्धा असतो? पाय सुरक्षित ठेवण्यासाठी आपण ज्या जोड्यांचा वापर करतो, ज्योतिषात त्यांचा संबंध 'शनी' ग्रहाशी जोडला जातो. अशा परिस्थितीत जोडे-चपलांशी संबंधित काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नकळत शनीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ एखाद्याकडून भेट म्हणून जोडे घेणे शुभ आहे की अशुभ? जोडे चोरीला जाण्यापासून ते तुटण्यापर्यंत किंवा ते विखुरलेले असण्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

(नक्की वाचा : Summer Tips: कुलरमधून खराब झालेल्या माशांसारखा घाणेरडा वास येतोय? 'हे' सोपे उपाय करून मिनिटांत दूर करा समस्या)

घरात जोडे-चप्पल कुठे आणि कसे ठेवावे?

Latest and Breaking News on NDTV
  • ज्योतिषशास्त्रानुसार जोडे-चप्पल भेट म्हणून देणे आणि घेणे, हे दोन्ही अशुभ मानले जाते. त्यामुळे विसरूनही कधी कोणाला जोडे किंवा चप्पल भेट देऊ नका. विशेषतः काळ्या रंगाचे जोडे कधीही कोणाकडून भेट म्हणून घेऊ नका.
  • ज्योतिषांनुसार व्यक्तीने कधीही पिवळ्या रंगाचे जोडे घालू नये, कारण हा रंग देवगुरु बृहस्पतीचा (गुरू ग्रह) असतो. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अपयश आणि दारिद्र्य येऊ शकते.
  • ज्योतिषानुसार जोडे-चप्पल कधीही शनिवार, अमावस्या किंवा मंगळवारी खरेदी करू नये. या दिवशी फुटवेअर खरेदी केल्यास दोष लागतो आणि आयुष्यात शनी ग्रहाशी संबंधित समस्या वाढतात. 
Latest and Breaking News on NDTV
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही जोडे-चप्पल काढू नये. ज्यांच्या घरासमोर जोडे-चप्पल इकडे-तिकडे विखुरलेले असतात, त्यांच्या घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा कायम राहते.
  • बाहेर वापरले जाणारे जोडे किंवा चप्पल घालून घरात कधीही फिरू नये. घराच्या आत आणि बाहेर वापरण्याच्या चपला नेहमी वेगळ्या ठेवाव्या.
  • कधीही फाटलेले किंवा घाणेरडे जोडे घालू नये. असे जोडे शनीशी संबंधित दोष, मानसिक ताण आणि दुर्दैव वाढवतात.
  • दुसऱ्या व्यक्तीचे जोडे-चप्पल वापरल्याने त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा, तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि कष्ट तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. आरोग्याच्या दृष्टीनेही दुसऱ्याचे जोडे वापरणे टाळावे.
Latest and Breaking News on NDTV
  • ज्योतिषानुसार जोडे-चप्पल कधीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात, पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये. या दिशेला ठेवलेली फुटवेअर नकारात्मक ऊर्जा वाढवतात, अशी मान्यता आहे. जोडे-चप्पल ठेवण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा निवडावी.
  • जोडे किंवा चप्पल हरवल्यास कधीही दुःख किंवा चिंता करू नये, कारण असे झाल्यास शनीशी संबंधित दोष दूर होतात, असे मानले जाते.
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com