Gandhi Jayanti Wishes 2024: राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा जन्मदिवस देशभरात गांधी जयंती (Gandhi Jayanti) म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर रोजी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईमध्ये महात्मा गांधींनी मोठी भूमिका बजावली आहे. गांधींनी संपूर्ण जगाला अहिंसा आणि सत्याचा मार्ग दाखवला. महात्मा गांधींचे विचार भावी पिढीसाठी देखील प्रेरणादायी आहेत. अहिंसेचा मार्ग स्वीकारून महात्मा गांधींनी देशासाठी स्वातंत्र्याची लढाई लढली. गांधी जयंतीनिमित्त मित्रपरिवार, कुटुंबीयांना शुभेच्छा संदेश (Gandhi Jayanti Wishes) पाठवून त्यांचे स्मरण करुया....
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Gandhi Jayanti 2024
1. गांधीजींच्या विचारांचे स्मरण करा
जीवनात मिळत राहील यश
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
2. अहिंसेचा मंत्र शिकवला
सत्याचे महत्त्व पटवून दिले
महात्मा गांधींनी भारत देशाला दाखवला नवा मार्ग
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
3. सत्य-अहिंसेचा मार्ग दाखवला
बापूंनी कधीही पत्करली नाही हार
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच होते त्यांचे उद्देश
असे महान होते आमचे बापू
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)
4. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर
आज चालत आहे संपूर्ण जग
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
5. दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल।
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
6. ते सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर कायम चालले
कधीच हार नाही मानली
त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: सर्वपित्री दर्श अमावस्या कधी आहे? या दिवशी पितृ चालीसाचे पठण करणे मानले जाते अतिशय शुभ)
7. खादी माझी शान, कर्म माझी पूजा
माझे कर्म आहे सच्चे आणि भारत देश माझा श्वास
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. सत्याग्रह करून इंग्रजांना हरवलं
गाधींजींचे योगदान कायम राहील लक्षात
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
9. राष्ट्रपिता महात्मा गांधी तुमच्या विचारांचा प्रकाश
नेहमी आमच्या हृदयामध्ये चमकत राहो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
10. तुम्ही आमचे राष्ट्रपिता
सर्व तुम्हाला प्रेमाने बापू म्हणतात
तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवला
सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world